प्रदीप जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. प्रा. शाळा सराटी येथे बाबासाहेब कोकाटे व दादा खरात मित्रपरिवारच्या वतीने मुलांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराटी येथे बाबासाहेब कोकाटे व दादा खरात मित्रपरिवार च्या वतीने शाळेतील मुलांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनानिमित्त लोखंडे सर यांचा सन्मान प्रदीप जगदाळे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी माऊली कोकाटे, सुरेश जगदाळे, अर्जुन कोकाटे, रामचंद्र मगर, महंमद तांबोळी, मधुकर गायकवाड, शरद काटे, हनुमंत कोकाटे ,बबन जगदाळे ,रावसाहेब कोकाटे, विठ्ठल जाधव ,सागर जगदाळे, छत्रपती व्यायाम शाळेचे सर्व पैलवान उपस्थित होते.

