shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक समाजासाठी आजही प्रेरक - प्रा. पंडितराव पाटील.

आद्य क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक समाजासाठी आजही प्रेरक    
- प्रा. पंडितराव पाटील.

  थोर क्रांतिकारकास २३१व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
इंदापूर प्रतिनिधी: ७ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र आद्य क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक यांची 231 वी जयंती साजरी होत आहे ;शासनाच्या वतीने उमाजींच्या भिवडी  ता.पुरंदर येथे  अनेक मान्यवरांच्या  उपस्थितीत  जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे. या निमीत्ताने या क्रांतिकारकारकाने आपले सर्वस्व पणास लावून ब्रिटिशांच्या अमानुष ,अत्याचारी व मनमानेल राजवटी विरूध्द पहिला संघटित उठाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे  त्यांना आद्य क्रांतिवीर म्हटले जाते.जुलमी सत्ताधिशांच्या विरुद्ध  लढण्यासाठी मोठी शैक्षणिक उपाधीची ,विशिष्ठ जाती-धर्मात जन्मास येण्याची अट लागत नाही तर सामान्यातील सामान्य माणूसदेखील लढा देऊन आपल्यावरील अन्यायाचे निवारण  करूशकतो.फक्त त्यासाठी जिद्द, धाडस,सचोटी व समूहाच्या कल्याणाची मनापासून उर्मी असावी लागते,हे उमाजींनी करून दाखविले म्हणून आजही ऐकशे नव्वद वर्षाच्या कालखंडानंतरही त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमीत्ताने समाज एकत्र येऊन ,त्यांचे समाजासाठी,राष्ट्रासाठी,स्वातंत्र्यासाठी असणारे योगदान समजून घेत आहे. 
फेब्रुवारी 1824 मध्ये त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने भांबुर्डीचा सरकारी खजिना लुटला ,या लुटीतील एकही छदाम स्वताःहासाठी अथवा समूहातील सदस्यांसाठी न वापरता त्यांनी तो पैसा देवळांची देखभाल , दुरूस्ती व समाजोपयोगी कामांसाठी वापरल्यामुळे उमाजींच्या उठावास राष्ट्रीयत्वाचा वेगळा आयाम प्राप्त झाला. या कृत्यास समाज मान्यता मिळाली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी रामोशी समाजाला गड  किल्ल्यांची देखभाल,संरक्षण,राखण इ.जोखमीची कामे त्यांचे अंगभूत गुण लक्षात घेऊन दिली होती.हा समाजाचा पारंपरिक हक्क व त्या  अनुषंगाने येणारी "नाईक " ही पदवी डावलल्यामुळे,या क्रांतिवीर ने ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरूध्द बंड पुकारले.उमाजीने ब्रिटिशांना अगदी सळो की पळो केले होते,त्याला पकडून देणार्यास दहा हजाराचे बक्षिस ठेवले होते.  शेवटी फंदफितूरीमुरळे 18 डिसेंबर 1831रोजी उमाजी  भोर जवळील उतरोळी गावात ब्रिटिशांकडून पकडला गेला.ब्रिटिशांनी त्याच्यावर खोटे गुन्हे व खोटे खटले दाखल करून त्याला फाशीची शिक्षा दिली. समाजात ब्रिटिशांची दहशत निर्माण व्हावी म्हणून या विरास 3फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील खडकमाळ येथे फाशी देण्यात आली.समाजासाठी आजही प्रेरक शक्ती असणारया थोर क्रांतिकारकास 231व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
प्रा. पंडितराव पाटील,उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन सेवानिवृत्त शिक्षक महासंघ,बावडा.
close