shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या दणक्याने लालपरी गावात ; देवळाली प्रवरा शहरात पूर्ववत एस. टी.वळविनेचे विभाग नियंत्रक यांचे आदेश : एसटी महामंडळाचे आभार -आप्पासाहेब ढूस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ 

प्रहारच्या दणक्याने लालपरी गावात ; देवळाली प्रवरा शहरात पूर्ववत एस. टी.वळविनेचे विभाग नियंत्रक यांचे आदेश : एसटी महामंडळाचे आभार -आप्पासाहेब ढूस..!!

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरात पूर्ववत एस. टी. वळविनेचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक यांनी आदेश दिले असून प्रहारच्या प्रयत्नाला यश आल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी एसटी महामंडळाचे आभार व्यक्त केले.

         देवळाली प्रवरा शहरात पूर्वीप्रमाणे एसटी वळवा अन्यथा प्रहारचे वतीने एस. टी. रोको आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा आप्पासाहेब ढूस यांनी एसटी महामंडळाला दि.४ सप्टेबर रोजी निवेनाद्वारे दिला होता. 

    त्या निवेदनात ढूस यांनी म्हंटले होते की, श्रीरामपूर आणि राहुरी या दोन्हीकडे जाणाऱ्या सर्व बसेस यापूर्वी देवळाली प्रवरा शहरामधून जात होत्या परंतु सध्या एसटीच्या वाहक आणि चालकांना विनंती करूनही ते देवळाली प्रवरा शहरामध्ये बस वळवत नाहीत. त्यामुळे शहरांमधील वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले, महिला यांना देवळाली प्रवरा शहरामधून जवळपास एक किलोमीटर शहराच्या बाहेर देवळाली सोसायटी चौकात रस्त्यावर येऊन थांबावे लागते. त्यामुळे या रस्त्यावरती चौकात अपघाताचे प्रमाण वाढले असून या सर्व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व देवळाली प्रवरा सोसायटी चौकातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या सर्व बसेस पूर्वीप्रमाणे देवळाली प्रवरा शहरात वळविणे अत्यंत गरजेचे आहे. 
       आप्पासाहेब ढुस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात विनंती केली होती की, त्यांनी श्रीरामपूर आणि राहुरी कडे जाणाऱ्या सर्व बसेस पूर्ववत देवळाली प्रवरा शहरात वळवाव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देवळाली प्रवास सोसायटी चौकात एसटी बसेस रोखण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल.       

         आप्पासाहेब ढूस यांनी दिलेल्या निवेदनाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक यांनी तात्काळ दखल घेतली असून श्रीरामपुरच्या आगार व्यवस्थापक यांना लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत की, आपल्या आगारातील सर्व चालक वाहक यांना श्रीरामपुर राहुरी मार्गावरील देवळाली प्रवरा चौकातून राज्य परिवहन बसेस मार्गस्थ न करता देवळाली प्रवरा येथील नियोजीत थांब्यावर राज्य परिवहन बसेस थांबवून प्रवासी विद्यार्थी चढ उतार करण्याबाबत सक्त सूचना देणेत याव्यात. पुनः प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा असे आदेशात म्हटले आहे. 

      प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे यांनी या विषयाचा पाठपुरावा केलेबद्दल त्यांचे व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निवेदनाची तात्काळ दखल घेवून कार्यवाही केलेबद्दल ढूस यांनी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600       
close