shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाभळेश्वर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा...!

बाभळेश्वर (प्रतिनिधी) : स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला रविवारी बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समितीच्यावतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

        यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे उपस्थित होते. यावेळी राहात्याचे शिक्षणविस्तार अधिकारी संजीवन दिवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बेंद्रे, पोलीस पाटील अण्णासाहेब बेंद्रे, शिवाजी बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, उपस्थित शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
        याप्रसंगी पंचायत समितीचे मा.उपसभापती बबलू म्हस्के, सोसायटीचे चेअरमन दौलत बेंद्रे, उपसरपंच अजित बेंद्रे, अमृत मोकाशी, अनिल म्हस्के, शंकरराव बेंद्रे, प्रमोद बनसोडे, अॅड.प्रकाश बेंद्रे, शंकर रोकडे, प्रकाश हुंडेकरी, दादा पठारे, बाळासाहेब मेहेर, प्रभाकर बेंद्रे, प्रल्हाद बेंद्रे, प्रा.डॉ.अनिल बेंद्रे, अविनाश साठे, राजू मोकाशी, अजित ब्राम्हणे, अशोक थोरात, शिवसेनेचे सोमनाथ गोरे, दीपक म्हसे, सतीश आहेर, राजू मकासरे, आर.डी.कदम, किशोर पारखे, अमोल आल्हाट, शरद चेचरे, संदीप राऊत, रमेश सत्रे, राहुल कटारिया, राजू गदिया, नारायण बेंद्रे, कैलास शेळके, ज्ञानदेव माळी, वाणी सर, किशोर कडू, भाऊसाहेब धनवटे, रमेश तोरणे, विलास वाकचौरे, सुर्यकांत खामकर, रवींद्र घोगरे, राजू बर्डे, जावेद शेख आदी उपस्थित होते. 
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद तोरणे यांनी केले  तर प्रास्ताविक गोरक्षनाथ बनकर यांनी मांडले आणि शेवटी आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे यांनी केले.
close