shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाठपुराव्याला यश...पिएम किसान ई-केवायसीसाठी ३०सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ

अहमदनगर (प्रतिनिधी):- पंतप्रधान किसान सन्मान  योजना अंमलबजावणी कक्षाने पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत बऱ्याचशा शेतकऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पना नाही तसेच काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक तसेच हाताचे ठसे देखील अपडेटेड नाहीत. 

यामुळे पीएम किसानच्या ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलबजावणी कक्ष तसेच मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब,पंतप्रधान, भारत सरकार, मा.श्री.नरेंद्र सिंहजी तोमर,साहेब,कृषिमंत्री, भारत सरकार, मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.श्री.अब्दुल सत्तार साहेब,कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेने केली होती. केंद्रीय कृषिमंत्रालयाला सदर निवेदन मिळताच तात्काळ दखल घेऊन ई-केवायसीसाठी अंतिम मुदतवाढ ३०सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्यात येत असल्याचे डॉ. प्रमोदकुमार मेहेरडा (सहसचिव), शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार तसेच ए.के. सिन्हा (उपसचिव पीजी),कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांनी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेला कळविले  आहे.

उर्वरित सर्वच शेतकरी बांधवानी अंतिम दिनांकापूर्वी ई-केवायसी करावी- शिवश्री. राहुल बाजीराव ढेंबरे 

पिएम किसान योजनेतील उर्वरित शेतकरी बांधवांनी ई-केवायसी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर करावी. म्हणजेच पिएम किसान योजनेचा लाभ यापुढेदखील शेतकरी बांधवाना मिळत राहील. 

शासकीय यंत्रणेबरोबरच सर्वच गावच्या सरपंचानी पुढाकार घेऊन आपल्या गावातील ई-केवायसी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना सूचित करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी म्हणजेच सर्वच गावातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करतो. असे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आमच्या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले.
close