shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जंगली झाडाचे वृक्षारोपण कार्यक्रम


शिर्डी प्रतिनिधी । (संजय महाजन):-
 
शिर्डी येथील आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर सिद्रामळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे  जंगली तसेच फळझाडे चे वृक्षारोपण करण्यात आले. 

         याप्रसंगी ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अमित जगताप म्हणाले की, पत्रकार तुषार महाजन आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या आदर्श निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कार्यरत आहे. आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून सर्वसामान्य वाचकांपासून तर सुशिक्षित वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून रात्रदिवस आहोरात्र जनजागृती करत आहे. बलशाली भारत घडविण्यासाठी आपण आणखीन जोमाने काम करावे.
         यावेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्राममळा मुख्याध्यापक संतोष जाधव, उपशिक्षक दिगंबर सुपेकर, उमेश डोवारे, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, हवेली तालुक्या संपर्क प्रमुख विनोद यादव, लोणी काळभोर अध्यक्ष सिद्धार्थ खंडागळे, बिरूदेव भास्कर, जीवन जाधव तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी
उपस्थित होते.
         वृक्षारोपण ही काळाची गरज आहे समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षाची लागवड ही आपल्या लेकरा प्रमाणे करावी. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील असे ग्रीन फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार तुषार महाजन यांनी म्हटले.
close