शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क..
शौकतभाई शेख श्रीरामपूर :-
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये परिसर स्वच्छता, वृक्षारोपन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी उपस्थित सर्वांना प्राचार्या सौ.सुनीता गायकवाड यांनी मुरकुटे साहेब यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की मुरकुटे साहेब हे शेतकरी कुटुंबात जन्मले व परिस्थिती वर मात करून सी.ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले.नंतर स्व.भास्करराव गलांडे पाटील यांच्या मुळे ते आमदार झाले व सलग पंधरा वर्षे तालुक्यातील जनतेची सेवा केली. तसेच अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां व सभासदांची पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले त्यामध्ये अशोक महाविद्यालय,अशोक इंग्लिश मेडियम स्कुल,अशोक पॉलिटेकनिक,अशोक आयडियल स्कुल,अशोक आय.टी आय अशी शैक्षणिक प्रगती केली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुनीता गायकवाड, प्रा.दिलीप खंडागळे, प्रा शिवाजी पटारे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुयोग थोरात, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

