निमसाखर येथील रणगाव ते रणमोडेवस्ती खंडोबानगर या रस्त्याची केली दुरुस्ती.
निमसाखरचे सरपंच धैर्यशील पाटील यांचे मानले युवराज रणमोडे पाटील व नागरिकांनी आभार.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर येथील रणगाव ते रणमोडे वस्ती खंडोबानगर या रस्त्याची दुरवस्था झाली होती हा रस्ता कोणत्याही शासन स्तरावरून किंवा एखाद्या फंडातून लवकरात लवकर व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्या मागणीला अनुसरून निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील रणवरे पाटील यांनी सदर दुरावस्था झालेल्या रस्त्यावर दगड व मुरूम टाकून त्या रस्त्याची दुरुस्ती केली. सदर रस्ता दुरुस्त केल्याने येथील युवराज रणमोडे पाटील व नागरिकांनी निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील रणवरे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी निमसाखर परिसरात दुपारी पावसाने जोरदार स्वरूपात हजेरी लावली होती. झालेल्या या पावसामुळे निमसाखर येथील रणगाव ते रणमोडेवस्ती, खंडोबानगर निमसाखर या रस्त्यावर पाणी साचून चिखल झाल्याने या भागातील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, दूध उत्पादक तसेच इतर प्रवासी यांची गैरसोयी होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे होते . या रस्त्यावरील लोकवस्ती जवळजवळ ४०० ते ५०० च्या वरती आहे. सदर नागरिकांच्या मागणीचा विचार करून संबंधित सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी सदर रस्ता हा जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित असून तो मंजूर झाल्यानंतर होईल असे सांगितले होते. परंतु शासन स्तरावरून मंजुरी मिळेपर्यंत होणाऱ्या नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन निमसाखरचे सरपंच यांनी सदर रस्त्याची काही स्वरूपात दुरुस्ती करून येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली.
सदर रस्त्याची दुरस्ता कायमची दूर करण्यासाठी शासन व प्रशासनाने नागरिकांच्या मागणीचा विचार करून तात्काळ रस्ता मंजूर करून नागरिकांची सोय करावी व निमसाखर गावातील सरपंच यांच्या प्रयत्नाला मदत करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे.

