मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१८,लातुर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.१७ व २८ सप्टेंबर दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शहरातील प्रणवश्री मंगल कार्यालयात मुक्तीसंग्राम दिन उत्सव,स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री तथा आ.संजय बनसोडे,अ.भा.स्वातंत्र्यता सेनानी समितीचे उत्तराधिकारी रविंद्र यळणुरकर,समितीचे माजी सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष उल्हास पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर व जम्मु कश्मीरचे प्रदेशाध्यक्ष आर.पी.सिंग यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलीदान देऊन निजामाच्या राजवटीतुन मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी लढा दिला त्या हुतात्म्यांना अभिवादन करीत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय,राज्य कार्यकारीनी मधील प्रमुख मान्यवरांनी राज्यभरातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बांधणी व समितीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व भ्रष्टाचारावर प्रतिबंधात्मक उपाय योजनाप्रती आराखडा तयार करुन कार्य करण्या संदर्भात अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.समितीच्या माध्यमातून ज्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्षा डाँ.कविताताई रायजादा,उपाध्यक्ष सलीमभाई शेख,राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर,राष्ट्रीय उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे-पाटील,महिला प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज सिंह पाटील,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण देशमुख,शिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा.राजेंद्र पालवे,अविनाश जाधव,संतोष ठाकरे-पाटील,समिर जमादार,सुमित दोरगे-पाटील,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,लातुर जिल्हाध्यक्ष नेताजी जाधव,लातुर महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई नाईक,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,हिंगोली जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई थिट्टे,हिंगोली किसान शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा पत्रकार विश्वनाथ देशमुख,सेनगाव तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे,सखाराम आकले,वसमत तालुका संघटक रमेश सावळे,प्रकाश जोगदंड सह हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


