shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मॅजिक बस फाउंडेशन" च्या वतीने रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमा..!

दापोडी:-
"दापोडी, पुणे. येथील जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय नुकत्याच महाविद्यालयातून पास आऊट(ग्रॅज्युएशन झालेल्या) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी "मॅजिक बस फाउंडेशन" च्या वतीने रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.

 
सी‌.के. गोयल महाविद्यालय आणि 'मॅजिक बस फाउंडेशन' पुणे. यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून महाविद्यालयातील ग्रॅज्युएशनच्या (पदवी) विद्यार्थ्यांसाठी रोजगारा संदर्भात प्रशिक्षण आयोजनाबाबत कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
    या सामंजस्य करारानुसार पहिल्या ट्रेनिंग प्रोग्राम (प्रशिक्षण कार्यक्रमाचे)चे उद्घाटन  गुरुवार दिनांक २९/९/२०२२ रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत संपन्न झाले.

       या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डाॅ. बाळासाहेब माशेरे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डाॅ.नागनाथ माने मॅजिक बस फाउंडेशन च्या वतीने मा. प्रमोद भालेराव, (ट्रेनर) मा. ज्योती वाकचौरे (ट्रेनर) मा. सुभाष मेहंदळे, (ट्रेनर) मा.सुजाता स्वामी हे उपस्थित होते.मॅजिक बस फाउंडेशन च्या वतीने दिनांक शुक्रवार दि.३०/९/२०२२ ते बुधवार दि.५/१०/२०२२ या कालावधीत सहा दिवसाचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

      या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, संभाषण कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, मुलाखत कौशल्य,व इतर कौशल्य प्रधान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ट्रेनिंग नंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी आय.टी क्षेत्र, हेल्थकेअर क्षेत्र, लॉजिस्टिक क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, हॉस्पिटलिटी क्षेत्र, इंडस्ट्रियल क्षेत्र, यासारख्या क्षेत्रात  रोजगाराजच्या संधी उपलब्ध करून दिला जाणार आहे

     या सामंजस्य करारानुसार वर्षभरात वेगवेगळ्या बॅचेस घेऊन ट्रेनिंग देण्यात येऊन रोजगार मिळावे आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त करून दिल्या जाणार आहेत.मॅजिक बस फाउंडेशन च्या वतीने घेण्यात येणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मधील पहिली बॅच शुक्रवार दिनांक ३०/९/२०२२ पासून सुरू होत असून सलगसहा दिवस सकाळी ८:०० ते १२:०० या वेळेत हे ट्रेनिंग चालणार आहे.

       या पहिल्या बॅचसाठी एकूण 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या ट्रेनिंग प्रोग्रामचे संयोजन:महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुभाष सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशिक्षण समन्वयक, प्रा डॉ. नागनाथ माने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारीप्रा. प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे, व इतर प्राध्यापक करणार आहेत.
    
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक: महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब यांनी केले.   
        

          प्रास्ताविकामध्ये बोलताना ते म्हणाले" महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने मॅजिक बस फाउंडेशन च्या सहकार्याने ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या संधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वयंरोजगार प्राप्त करावा"
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. परबतराव बैसाणे यांनी केले.आभार: प्रा महेंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.प्रियंका पवार, प्रा. डॉ.  नागनाथ माने, प्रा.वैभव डावखर श्री. कपिल कांबळे आणि इतर प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close