दिल्ली:- राजस्थानचे वादग्रस्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत १० जनपत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन बैठकीदरम्यान राजस्थान मध्ये घडलेल्या घटनेबाबत खंत व्यक्त करुन माफी मागितली. आणि ही घडलेली चुक मला आयुष्यभर दुःख देत राहील.असेही सांगितलेे.
यावेळी सोनिया गांधी यांच्या सोबत त्यांनी साधक बाधक चर्चा केली. त्यानंतर बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मी काॅग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले. आणि मुख्यमंत्री पदावर रहाणार कि कसे असे विचारल्यावर गहलोत म्हणाले की हा निर्णय देखील पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणी घेईल ,मी काॅग्रेस पक्षाचा प्रामाणिक शिपाई आहे..त्याच पध्दतीचे माझे काम राहिल असेही सांगण्यास विसरले नाहीत.

