प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज तालुक्यातील युसुफ वडगाव व तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात सोयाबीन पीकावर सुरुवातीपासूनच संकटे होती. पेरणी केल्यास आधी तर बियाणे कंपनीने फसवले बऱ्याच सोयाबीन पिकाचे वाण उगवलेच नाही. जे काही उगवले ते गोगलगाय ने खाऊन टाकले. नंतर पिवळा मोझ्याक तांबेरा, आधी अति पाऊस आणि आता पावसाचा खंड. हे सर्व संकट असताना विम्यातून युसुफ वडगाव,बनसारोळा महसूल मंडळे वगळल्यामुळे शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
या अंदोलनात प्रा.डॉ. हनुमंत सौदागर,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,संभाजी ब्रिगेड चे उपजिल्हाध्यक्ष राहुल खोडसे,शिवसंग्राम चे डॉ खोडसे, सतीश भाऊ शिंदे,शिवदास पाटील,अमोल पाटील,रुपेश बोरगावकर, गणेश इंगळे,गणेश नांदे,प्रवीण खोडसे,गणेश गुजर,सुग्रीव करपे तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. या अंदोलनामुळे प्रशासनाचे धाबे दणालले आहे.



