माळ पाचवी ..
रुप पाचवे ते लोभस
सुहासिनी स्कंधमाता
साधक विशुद्ध चित्ता
पावे तल्लीन पूर्णता
पुत्र स्कंद कार्तिकेय
काखेत तव संस्थिता
सिंह प्रिय वाहन तव
शोभे पद्मासन स्थिता
सामाऊनि घेते सृष्टी
त्रिखंड असे अंकिता
भक्तांवरी शांत दृष्टी
शुध्दशुभ्र वस्त्रांकिता
चतुर्भुजा कमलधारी
पुजा पंचमी ललिता
मृत्यूलोकां मोक्षदायी
भक्तवत्सला फलिता
नैवेद्यात ठेवी लोणी
दावी तुझी स्निग्धता
उपासना तव करता
होईलं मनात मुग्धता
तेजोमय प्रसन्न रूप
सूर्य मंडळ अधिष्ठिता
महामाता जगत् त्राता
दिली सकला तुष्टता
- हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
२)
हरित रंग ..
( पंचम दिन )
माळ आज पाचवी
शोभला हिरवा रंग
कपडे फक्त निमित्त
धुवावे मनीचे व्यंग
स्कंदमातेचे पायशी
घोटाळती मन भृंग
निसर्ग देवी ललिता
प्रिय तिला हरितरंग
गरबा दांडिया खेळ
मोहरून आले अंग
निमीत्ताने उत्सवाचे
होती सारे एक संघ
कुमारिकाभोज करू
उत्साहात सारे दंग
गोड लागे घास सारे
महाशक्ती भक्तीझिंग
पोपटासम गोडबोलू
मनात आनंद तरंग
देवी माते तव कृपेने
स्वच्छ करू अंतरंग
आई राजा गं उदे उदे
जय घोष घुमे उत्तुंग
भक्तीत व्हायचे दंग
वाजवून टाळ मृदंग
- हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996.
www.kavyakusum.com

