इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील वरकुटे (बु.) पाटी जवळ बंदुकीच्या धाकावर ३ कोटी ६० लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश.
सहा आरोपींना अटक तर दरोड्यातील १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये देखील केले हस्तगत.
इंदापूर प्रतिनिधी:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील वरकुटे (बु.) पाटी जवळ शुक्रवारच्या (दि.२६ ऑगस्ट) पहाटे गोळीबार करत बंदुकीच्या धाकावर ३ कोटी ६० लाखांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अवघ्या ७२ तासांत पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर शिवाजी होनमाने, ज्योतिराम चंद्रकांत कदम (दोघेही रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), रजत अबू मुलाणी (रा. न्हावी, ता. इंदापूर), गौतम अजित भोसले (रा. वेने, ता. माढा जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (लोणी देवकर, ता. इंदापूर) आणि भूषण लक्ष्मीकांत तोंडे (लोणी देवकर, ता. इंदापूर) अशा सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यातील १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये देखील हस्तगत केले आहेत.
सविस्तर हाकिकत अशी की,शुक्रवारी (दि.२६ ऑगस्ट) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्कॉर्पिओ (नंबर. टी. एस.०९ ई.एम. ५४१७) गाडीवर बंदुकीतून गोळीबार करून गाडीतील रोख रकमेसह ३ कोटी ६० लाख २६ हजारांचा ऐवज सहा दरोडेखोरांनी लुबाडला होता. इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवेवर घडलेल्या या घटनेतील स्कॉर्पिओ गाडीवर दोन ठिकाणी गोळ्या लागल्या होत्या. या घटनेबाबत भावेशकुमार अमृत पटेल (रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.२६ ऑगस्ट) सहा अज्ञात दरोडेखोरांविरोधात भा.द. वि. ३९५ कलमांतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तीन आणि इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती. प्राथमिक तपासामध्ये वरील आरोपी क्र. १,२ आणि ३ यांची नावे उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने आरोपी क्र. १ आणि २ यांना कुर्डुवाडी येथून, तर आरोपी क्र. ३ याला न्हावी येथून अटक करण्यात आली होती. या तिघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पोपटासारखे बोलू लागले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या तिघांकडे केलेल्या तपासाअंती आरोपी क्र. ४,५ आणि ६ यांची नावे समोर आली. तात्काळ गुन्हे शाखेचे एक आणि इंदापूर पोलिसांचे एक अशी दोन पथके पाठवून या तिघांनाही राजस्थान पोलिसांच्या मदतीने प्रतापनगर (उदयपूर, राजस्थान) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उप निरीक्षक अमित सिद पाटील, पोलीस उप निरीक्षक, गणेश जगदाळे, सहा. फौजदार रविराज कोकरे, तुषार पंदारे, बाळासाहेब करांडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे,अजय घुले, जनार्दन शेळके, राजु मोमीण, विजय कांचन, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वानिल आहीवळे, पो.काँ. अक्षय नवले, चालक पो. हवा. प्रमोद नवले, होम. जयेश पाथरकर, पो. हवा. रविंद्र पाटमास नेम वालचंदनगर पो.स्टे, तसेच बारामती शहर येथील पो. हवा. कल्याण खांडेकर, इंदापुर पो.स्टे. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सपोनि महेश माने, पोसई सुधीर पांडुळे, पोना सलमान खान, पोकों विशाल चौधर, पो.हवा सुरेद्र वाघ, पो.हवा. कल्यान खांडेकर, पो.हवा. मनोज गायकवाड, पो.हवा. सचिन बोराडे, पोना मोहमंद आली मड्डी, पोना बापु मोहीते, पो.कॉ. लक्ष्मण सूर्यवंशी, पो.कॉ. दिनेश चोरमले, पो.कॉ. विनोद काळे, पो.कॉ. सुरज गुंजाळ यांनी केली. तसेच प्रतापनगर पोलीस ठाणे राजस्थान येथील पोलीस निरीक्षक दर्शन सिंग राठोड, पो. हवा. बुटी राम, पो. हवा. गोविंद सिंग, पो. कॉ. रूद्रा प्रताप सिंग यांनी राजस्थान येथे आरोपी अटक करणे कामी मदत केली.

