shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चर्मकार संघर्ष समितीच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण केदारे,तर तालुका अध्यक्षपदी सुभाष उदमले यांची नियुक्ती


शौकतभाई शेख श्रीरामपूर:
संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) ही संस्था विविध समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विधायक कार्य सातत्याने राबवित आहे, विविध सामाजाभिमुख कार्याच्या बळावर अति अल्पकाळात संस्था राज्यभर लोकप्रिय ठरत असुन राज्यभरातील समविचारी नागरीक बंधू- भगीनी यामध्ये स्वखुशीने सहभागी होत आहे,लवकरच ही सामाजिक संघटना संपूर्ण राज्यभर आपला कार्य विस्तार वाढवणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी अहमदनगर येथील संस्थेच्या एका पदाधिकारी पदनियुक्त कार्यक्रमात बोलताना सांगितले.

चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या उपस्थितीत संघटनेच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविण केदार तर अहमदनगर तालुकाध्यक्षपदी सुभाष उदमले यांची नियुक्ती करण्यात आली.

बोल्हेगांव फाटा,अहमदनगर येथील संस्थेच्या उपकार्यालयात संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये वरील निर्णय घेण्यात आला.
चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या हस्ते श्री.केदार व उदमले यांना नियुक्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त अहमदनगर तालुका अध्यक्ष सुभाष उदमले आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण केदारे यांनी उपेक्षित समाज बांधवांना संघटित करून गोर- गरीब समाज बांधवांची कामे प्राधान्याने करण्याचे आणि संस्थेच्या वरिष्ठांनी जो आपल्यावर विश्वास टाकला,दाखवला त्यास सार्थ करण्याचा इमाने इतबारे सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल असे आश्वासनही यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी संघटनेचे सोशल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष देविदास कदम, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जगताप, युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खरात, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण केदारे, शहर संघटक अशोकराव कांबळे, महेश खंडागळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यांच्या या निवडीबद्दल समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार, परिवर्तन फाऊंडेशनचे उत्तमराव दाभाडे, एकलव्य संघटनेचे शिवाजीराव गांगुर्डे,तथा चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) सर्व पदाधिकारी,महीला भगीनींनी अभिनंदन केले आहे.
close