श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,सर्वसामान्य नागरिक आणि माजी सैनिकांना तत्परतेने न्याय देणारे कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रशांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिदल सैनिक सेवा संघ शाखा श्रीरामपूर व परिवर्तन फाऊंडेशन श्रीरामपूर यांच्यावतीने अभिष्टचिंतन करत पुष्पगुच्छ व शाल देऊन उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या,सोबतच शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे , परिवर्तन फाउंडेशनचे सचिव व त्रिदल सैनिक सेवा संघ नगर उत्तरचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,त्रिदल तालुका अध्यक्ष संग्रामजीत यादव ,त्रिदल सदस्य मेजर सुनील गवळी ,व युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे शाखा श्रीरामपूरचे एस सी एस टी जॉईंट सेक्रेटरी गोरख आढाव उपस्थित होते.

