शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२
करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू : काल पाझर तलावात आढळला मृतदेह..!!
पाथर्डी : तालुक्यातील करोडी येथील ओढयाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका आठ वर्षाच्या आदिवासी मुलीचा पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्यामुळे मृत्यू झाला. आज सकाळी करोडीच्या पाझर तलावात तिचा तरंगलेला मृतदेह आढळुन आला.
(8, रा. करोडी, ता. पाथर्डी) असे या घटनेत मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार करोडी शिवारात डोंगर परिसरात भोसले कुटुंब रहातात.घराच्या शेजारी ओढा होता. सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस आल्याने अचानक ओढ्याला पुर आला घराजवळ मयुरी ओढ्या नजीकअसताना आलेल्या पाण्यात वाहून गेली.
तिचे वडील कामाला गेले होते तर आई शेळ्या चरण्यासाठी गेली होती. आल्यानंतर रात्रभर तिच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मयुरीचा शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. मंगळवारी सकाळी नऊ वाजता करोडी गावच्या शिवारातील पाझर तलावात मयुरी हिचा मृतदेह तरंगल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक ईश्वर गर्जे,पो.कॉ.एकनाथ गर्कळ यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर गर्जे हे करीत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

