shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


प्रतिनिधी : सचिन गांधी

तासगाव : १७ /   भारतीय  स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ यांचे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले . त्यांचे वय १०३ वर्षाचे होते .बाबू नदाफ हे तासगाव तालुक्यातील गणे राजुरी येथील रहिवासी होते .

 क्रांतिसिंह नाना  पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री  वसंत दादा पाटील, बर्डे गुरुजी, यांच्यासोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली त्या तुफानी सेनेतील एक क्रांतिकारक बाबू हसन नदाफ हे होते .राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले होते .भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे लाईन उखडणे, रेल्वे लुटणे अशा महत्त्वाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता . त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाची सावट पसरली आहे . बाबू नदाफ यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने अर्पण करण्यात आली.

दुखांकित महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद महाराष्ट्र प्रदेश सचिव अभयजी बाफना प्रदेश उपाध्यक्ष बीके सौदागर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी राज मोहम्मद शेख युवा प्रदेश अध्यक्ष संदीप पवार इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलास पठारे, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान शेख, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, रायगड जिल्हाध्यक्ष मुदसिर पटेल ,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
close