मुंबई:- मुंबई येथे अंधेरीभागातील एका हाॅटेलमध्ये एका ३०वर्षीय माॅडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सदर मृतदेह तपासणी करताना वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. तसेच एडीआर अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्याने मृत मॉडेल नैराश्यात होती असा संशय व्यक्त केला जात आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही मॉडेल लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीची रहिवासी होती. घटनास्थळी वर्सोवा पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. यामध्ये लिहलंय, 'मला माफ करा.. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, मी आनंदी नव्हते.
मला फक्त शांती हवी होती'. असं म्हणत या मॉडेलने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं की, या मॉडेलने बुधवारी रात्री हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती.
तिने हॉटेलच्या खोलीतच आपल्यासाठी जेवण मागवलं होतं. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये चेक इन करुन जेवणाची ऑर्डर दिली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. परंतु अनेकवेळा बेल वाजवूनही या मॉडेलने दार उघडलं नाही.
ज्याची माहिती वेटरने हॉटेलच्या मॅनेजरला दिली, मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन माहिती दिली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी मास्टर किच्याआधारे खोलीचा दरवाजा उघडला. आत पाहिलं असता, मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस पुढील तपास करत आहेत.

