shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतात तब्बल ७० वर्षांनंतर चित्ता परतला...! आठ चित्ते 'कुनो' अभयारण्यात सोडून पंतप्रधान मोदींनी दिली वाढदिवसानिमित्त वनविभागास अनमोल भेट..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात तब्बल ७० वर्षानंतर सर्वात वेगवान प्राणी म्हणून प्रसिध्द असलेला "चित्ता" प्राणी आणून  मोदींनी नवा इतिहास रचला आहे. नामिबियातून‌ खास विमानाने आणलेले आठ चित्ते मोदींच्या हस्ते कुनो अभयारण्यात सोडण्यात आले. 

नमिबियातून विशेष बोईंग  ७४७-४००विमानाने ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे चित्यांचे आगमन झाले.
सलग २० तासांत ८०००किलो मीटरचे अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले. आठ चित्त्यांमध्ये ५ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाल्यानंतर चित्यांना कुनो अभयारण्यात‌‌ आणण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्त्यांना अभयारण्यात सोडलं तो क्षण भारताला प्रसन्न ‌करणारा होता.
close