शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
शिर्डी शहरांमध्ये गेल्या आठ पंधरा दिवसापासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेले होते अनेक बंधारे नाल्यांवर अतिक्रमण असल्यामुळे पाणी जाण्यास जागा नसल्या कारणामुळे ते गाव गाव भागात पाणी घुसले आहे.
अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले होते.तरी आता एक दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने पाणी कमी करावे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
तरी काल मी भेट दिल्यानुसार नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या काही ठिकाणी चेंबर मधून पाणी येत आहे तरी नगरपालिका प्रशासनाने तेही पाहिले नगरपालिका प्रशासनाने व मुख्य अधिकारी यांनी पाणी कमी करण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली तरी काय भागांमध्ये पाणी अजूनही साठलेले आहे. तरी ते कमी करावे अशी मी मागणी करतो असे शिवसेना उपतालुकाप्रमुख राहता अक्षय रमेश तळेकर पाटील यांनी व्यक्त केले.

