दिलीप स्वामी यांच्या सायकल बँक या उपक्रमास मिळतोय नागरिकांकडुन प्रतिसाद
प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा : १६ / सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सायकल बँक या उपक्रमांतर्गत उत्तर वडगाव येथील आदर्श शिक्षक मधुकर शिंदे यांनी उत्तर वडगाव येथील गरजू विद्यार्थिनी श्रुती गाडे हिला स्वतःची सायकल भेट देऊन मदतीचा हात पुढे केला आहे त्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मधुकर शिंदे सरांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक होत आहे.
यावेळी जातेगाव चे केंद्रप्रमुख संतोष पोतदार यांनी सांगितले की आपल्या गावामध्ये एखाद्या च्या वापरात नसलेली सायकल अशीच पडून असेल तर ती आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करावी. ती सायकल दुरुस्तीचा येणारा खर्च आम्ही सर्व शिक्षक करू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना ती सायकल वापरण्यास देऊ.यामुळे टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम ही प्रत्यक्ष अंमलात येईल आणि विद्यार्थ्यांची ही गरज पूर्ण होईल.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन कांबळे यांनीही मधुकर शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
मधुकर शिंदे यांच्या बद्दल बोलताना किसन कांबळे पुढे म्हणाले की ,मधुकर शिंदे सारख्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या तळमळीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकांचे पाल्य आणि गुणवंत विद्यार्थी आकाशाला गवसणी घालत आहेत. तसेच जिल्हा परिषदांच्या शाळा उत्कृष्ट काम करत आहेत हे ही दिसून येत आहे.
करमाळा तालुक्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांचे प्रेरणेने , गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब , गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली , विस्तार अधिकारी जयवंत नलवडे ,सर्व केंद्र प्रमुख आणि शिक्षक शिक्षीका यांच्या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम मोठ्या उत्साहात गावोगावी होताना दिसत आहे.

