खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात यशवंतराव चव्हाण सेंटर संचलीत कौटुंबिक समस्या समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन संपन्न.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर संचलीत कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्र इंदापूर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने आज (१६ सप्टेंबर) संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ केला.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशिर मदत व मार्गदर्शन केंद्र इंदापूर तालुका याठिकाणी सुप्रियाताईं सुळे व भारतीताई शेवाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आॅनलाईन पद्धतीने उद्घाटन सुप्रियाताईंनी इंदापूर तालुक्यामधुन केले .
यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी या समुपदेशन केंद्राची माहीती देत म्हणाल्या की, समाज्यामध्ये व्यक्तींना माणसिक त्रास असतो जसे कि भय ,न्युनगंड भिती ,निर्णय न घेता येणे अशा समस्या आहेत. त्या समस्या या समुपदेशन केंद्रा मार्फत सोडवल्या जातात ,व्यकत्तींमध्ये आत्मविश्वास वाढविणे ,जनजागृती निर्माण करणे ,न्याय मिळवून देणे हा या पाठिमागचा उदेदश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर , जय भवानी विकास प्रतिष्ठानच्या चित्राताई ढोले ,उमा इंगोले ,स्मिता पवार ,सुनिता भोसले ,रूपाली नगरे ,उज्वला परदेशी ,रेहणा मुलाणी व जिल्हा समन्वयक कांचनताई ढमाले ,यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला समन्वयक मृणमयताई तसेच वकिल सेलचे अध्यक्ष किरण धापटे, इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण सेंटर च्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. महिलांसाठी आर्थिक साक्षरता तसेच विधी साक्षरता असे उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून आता “कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन' हा आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. विधी आक्षरता या अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून बऱ्याच महिलांना स्वतःशी संबंधीत कायद्याच्या आणि अधिकाराच्या बऱ्याच गोष्टी माहीत नसल्याचे आपल्याला या कार्यक्रमांतून जाणवल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील बहुतांश महिलांना किंवा कुटुंबांना कौटुंबिक समस्या निवारणासाठी कायदेशीर प्रक्रिया असते याची खूपच कमी माहिती असते. परिणामी त्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. त्यामुळेच ती कुटुंबे अथवा त्या महिला कायदेशीर प्रयक्रियेचा अवलंब करत नाहीत. अशा सर्व महिलांना आणि कुटुंबांना योग्य तो कायदेशीर सल्ला देत न्याय प्रक्रियेमध्ये आणणे किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठीच यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे 'कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रा'ची सुरवात करण्यात येत आहे.
पुण्यासह जिल्ह्यातील सर्व १३ तालुके आणि मुंबई, ठाणे, औरंगाबाद, बीड, सिंधुदुर्ग, परभणी, नाशिक, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही ही मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येत आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले. या केंद्रांमध्ये कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात या पुढे प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राच्या ठिकाणी हे मार्गदर्शन केले जाईल
यावेळी तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर , जय भवानी विकास प्रतिष्ठानच्या चित्राताई ढोले ,उमा इंगोले ,स्मिता पवार ,सुनिता भोसले ,रूपाली नगरे ,उज्वला परदेशी ,रेहणा मुलाणी व जिल्हा समन्वयक कांचनताई ढमाले ,यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला समन्वयक मृणमयताई तसेच वकिल सेलचे अध्यक्ष किरण धापटे, इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

