श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
शहरात सध्या प्रचंड प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने शहरातील नागरीकांना खुपच त्रास सहन करणे भाग पडत होते, सदरील कुत्रे काही लहान बालकांसह अनेकांना चावा घेत असल्याने शहरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते, श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने तात्काळ यावर उपाय योजनांचा अंमल करुन शहरवासीयांना या त्रासापासून मुक्त करावे असे समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी मुख्यधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधत सदरील मोकाट कुत्र्यांचा आठ दिवसांत योग्य बंदोबस्त करावा अन्यथा सदरील मोकाट कुत्र्यांना पकडून नगर पालिकेच्या आवारात सोडण्याचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला होता,त्यावर तात्काळ श्रीरामपूर नगर पालिकेने दखल घेत शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली असल्याने समाजवादीचे जोएफ जमादार यांच्यासह शहरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री.जमादार यांनी दिलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले होते की,सध्या श्रीरामपूर शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण खुपच वाढले असून त्यावर श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कोणतेही उपाय योजना,योग्य नियंत्रण होत नसल्याचे आढळून येत आहे,शहराच्या सर्वच परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असल्याचे दिसून येत आहे, सदरील कुत्रे बेफामपणे सर्वत्र फिरत आहेत,अनेकांना चावा घेत आहे,वाहनांना आडवे येऊन अपघातांची कारणे ठरत आहे,यामुळे शहरातील नागरीकांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही अशी भयानक परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे, म्हणून या मोकाट कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त हा वेळीच होणे गरजेचे आहे,
नगर पालिका प्रशासन शहर वासियांकडून नेहमी आवश्यक सर्व प्रकारचा कर गोळा करते, त्यामुळे नागरी समस्यांचं निराकरण करुन नागरीकांना त्रासापासून सुटका देणे हे देखील नगर पालिका प्रशासनाचे काम असते, मात्र सर्व काही वेळेवर घेऊन परतीत मनस्ताप देत उलटे पांग फेडण्याचे धोरण जर नगर पालिका प्रशासन राबवत असेलतर हे सर्रास चुकीचे ठरणारे आहे ? कारण या मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले असून या मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र संचारामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे, मागे नुकताच दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी सरस्वती कॉलनीतील चि.मयुर चंदन बनसोडे या पाच वर्षाचा निरागस बालकास या मोकाट कुत्र्यांची चावा घेवून गंभीर जखमी केले, असे प्रकार हे शहरात नित्याचेच होऊन बसले आहे,या मोकाट कुत्र्यांच्या चावण्याने निरपराध नागरिकांना जिवीतास काही बरे वाईट झाले तर याची जबाबदारी कोणाची ?, नगर पालिका प्रशासन ही जबाबदारी घेणार का ?,भरपाई देणार का ?,असे एक ना अनेक प्रश्न सध्याया निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र इतकं काही घडुनही जर नगर पालिका प्रशासन निद्रावस्थेची भुमिका घेत असेलतर नाविलाजास्तव शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांना पकडून नगर पालिका आवारात सोडणे भाग पडू नये याकरिता
संबंधित नगर पालिका प्रशासनाने आपले स्तरावरुन सदरील प्रश्नी योग्य निर्णय घेऊन उचित कार्यवाहीचे आदेश देत या मोकाट कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा,अन्यथा येत्या आठ दिवसांत यावर काही एक कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही वेगळ्या पध्दतीने आंदोलनाचा पावित्रा हाती घेऊन शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांना पकडून आपल्या नगर पालिका कार्यालयाच्या आवारात सोडून देऊ पुढे यापासून निर्माण होणाऱ्या परिस्थिती आणि परिणामास संबंधित नगर पालिका प्रशासनाच जबाबदार असेल करीता या निवेदनाचा गांभिर्याने विचार करुन आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही सत्वर करावी ,असा इशारा समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिला होता.
आसिफ तांबोळी,अय्युब पठाण, इमरान शेख,एजाज़ शाह, ज़करिया सैय्यद, अरबाज़ क़ुरैशी,शहेजाद शेख, दानिश शेख, निसार शेख, दानिश शाह,रफीक शेख, रियाज़ शेख, आदी त्यावेळी निवेदन देताना उपस्थित होते.मात्र नगर पालिका प्रशासनाने वेळीच या निवेदनाची दखल घेत शहरातील मोकाट कुत्र्यांची धरपकड चालु केल्याने तथा उद्यापासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असल्याने सकाळ सायंकाळ शहरासह उपनगरातील देवी मंदीर परीसरात महीला, बाल- गोपाळ,वयोवृद्ध तथा देवीभक्तांची वर्दळ वाढणार आहे,मात्र त्याआधीच श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतल्याने शहरात सर्वत्र दहशतमुक्त शांततेचे वातावरण निर्माण होऊन समस्त नागरीकांकडून नगर पालिका प्रशासनाचे आभार प्रकट करत धन्यवादही देण्यात येत आहे.

