shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तळागाळातील गुणवत्तेला न्याय देण्याचं महान कार्य वर्ल्ड पार्लमेंट करत आहे -- मा.न्या. विलासराव घोडचर.

श्रीरामपूर । प्रतिनिधी:-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा योग साधून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरूषांना वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने  " वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटर नॅशनल लेडी अवॉर्ड २०२२ " व  वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ " तसेच  वर्ल्ड पार्लमेंटचे आजीव सदस्यत्व देऊन सन्मानीत करण्यात आले. श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात झालेल्या एका शानदार कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.न्यायाधीश विलासराव घोडचर यांनी वर्ल्ड पार्लमेंटच्या प्रत्येक अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना तळागाळातील असामान्य गुणवान व्यक्तींना हेरून आंतरराष्ट्रीय सन्मान देण्याच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

         मा.न्यायाधीश. विलासराव घोडचर, मा.सौ सुलेखा घोडचर, मा. नगराध्यक्षा व शिर्डी साई संस्थानच्या मा.विश्वस्त अनुराधाताई आदिक, दै. मराठवाडा केसरीचे संपादक मा. श्री. अशोकराव झोटींग, जेष्ठ विधीतज्ञ व क्रिमीनल लॉयर अँड. हेमंत गोविंद थोरात, पुण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विलास बबनराव काळोखे यांच्या उपस्थितीत व हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. वरील मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले.

            कार्यक्रमाचे उदघाटन वर्ल्ड पार्लमेंटच्या पारंपारीक प्रथेप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते पवित्र अशा तुळशीला जलार्पण करून करण्यात आले. तसेच औसा. जिल्हा लातूर येथील जि.प.प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा चव्हाण यांनी स्वागतगित गायीले.  वर्ल्ड पार्लमेंटचे ग्लोबल प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टीन, उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मूर्ती, सेक्रेटरी जनरल डॉ.युजीनिया अलमंड यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

              संस्थेच्या कार्याचा आढावा व भावी कामाचे नियोजन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले, तर खजिनदार चिंतामण भोसले यांनी अध्यक्षीय सुचना मांडली. सचिव  प्रा. अरूण सावंग यांनी आभार प्रदर्शन केले.  मा. श्री. प्रसन्नकुमार धुमाळ यांनी आपल्या मधाळ वाणीने अतिशय सुंदर असे सुत्र संचलन केले.

 वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ साठीचे पुरूष पुरस्कार्थी  श्री. विलास बबनराव काळोखे, पुणे (सामाजिक कार्य). श्री. हर्षल सुभाष पंडित,  पुणे ( सामाजिक कार्य, स्माईल व्यसनमुक्ती केंद्र.), श्री. तानाजी शंकर मराठे, पुणे. (सामाजिक कार्य.). श्री. सुरेश यशंवतराव दाभाडे, पुणे (सामाजिक कार्य). श्री. भारत रंगनाथ पवार, देवळा, नाशिक,  (चित्रकारीता ). श्री. संतोष नानाभाऊ रणसिंग,पुणे (शैक्षणिक),  त्याचबरोबर 

वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट इंटरनॅशनल लेडी अवॉर्ड २०२२ साठीच्या महिला पुरस्कार्थी : -

 डॉ. प्रेमिला मारूती तळवडकर,  पुणे, सामाजिक कार्य, (जीएसटी इन्स्पेक्टर, पुणे ), अँड. डॉ. जया रत्नमाला बाळकृष्ण उभे, पुणे. शैक्षणिक [ जगातील सर्वात जास्त (पदवी ) डिग्री घेतलेली व्यक्ती. श्रीमती. प्रिती दिपक वैद्य, कामशेत, पुणे (सामाजिक कार्य ). श्रीमती.संगिता भाऊसाहेब जामगे,  परभणी,  (सामाजिक कार्य). डॉ. कामिनी राजीव पाटील, सातारा, (वृत्तपत्र संपादिका व सामाजिक कार्य), मा.डॉ. सुरैय्यापरवीन एस.जाहागिरदार, सोलापूर (शैक्षणिक व साहित्य),  डॉ. शोभा बाळासाहेब महाजन, कोल्हापूर, ( वैद्यकिय व ऑस्ट्रोलॉजी.). श्रीमती. शोभा मरिबा चव्हाण,  लातूर (शैक्षणिक व साहित्य). श्रीमती. दैवशला वसंतराव लातूर, (शैक्षणिक व सामाजिक कार्य).सौ. मंगल सतिश सासवडे, शिक्रापूर, पुणे, (सामाजिक कार्य) सौ. संगिता शिवाजी शिंदे, सातारा (सामाजिक कार्य). सौ. शबनम समीर डाफेदार, दौंड, पुणे (शैक्षणिक, सामाजिक कार्य), सौ. सुवर्णा प्रकाश बोडके, नाशिक (शैक्षणिक व साहित्य), डॉ. स्मिता विजय मामीलवाड, लातूर, (शैक्षणिक, साहित्य तसेच पदवीधर शिक्षकांच्या प्रशिक्षिका), श्रीमती. जयश्री चंद्रप्रकाश पाटील ( शैक्षणिक व सामाजिक), श्रीमती. अनिता मारूती खडके, लातूर (शैक्षणिक व साहित्य). यांना सन्मानीत करण्यात आले.
              सदर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव प्रा.अरूण सावंग, खजिनदार चितांमण भोसले व  त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
close