shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आसरडोह जिल्हा परिषद सर्कल मधील कोळपिंप्री गावात विविध विकास कामाचा आडसकर यांच्या हस्ते शुभारंभ !!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि!!

कोळपिंपरी ता धारूर येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ व ग्रामपंचायत अंतर्गत जलशुद्धीकरण व शीतकरण प्रकल्प (आर. ओ. प्लांट), अंगणवाडी ते लेंडुळी पुला पर्यंत नाली बांधकाम,  कोळपिंपरी ते धारूर वाट पाणंद गायरान ते वाघोली - कोळपिंपरी शिवरस्ता, अंगणवाडी इमारत बांधकाम व सुशोभीकरण, व्यायामशाळा इमारत, सार्वजनिक शौचालय, बस स्टँड व आलाट वस्तीवर बोअरवेल, मोटर, टाकी बसविणे, जुन्या हातपंपावर दुहेरी पंप बसविणे, गावांतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसविणे, दलित वस्तीत सिमेंट रस्ता व पथदिवे बसविणे , शाळा दुरुस्ती करणे, अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर पेव्हर ब्लॉक करणे , कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा माजलगाव मतदारसंघाचे भाजपा नेते रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 





 रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप, श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांना पगार मंजुरी पत्र वाटप, शेतकरी बांधवांना म.ग्रा.रो. ह.यो योजने अंतर्गत जलसिंचन विहिरीचे मंजुरी आदेश वाटप, करण्यात आलेपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना साडी वाटप करण्यात आले. 

              

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब सोळंके गुरुजी, प्रमूख पाहुणे ऋषिकेश भैया आडसकर,शाखा अभियंता एल. यु. साळुंखे, कृ. उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल शिनगारे,उद्धवराव इंगोले,शिवाजी काचगुंडे,शिवाजी मायकर, भारत सोळंके, श्रीनिवास थोरात, शेषराव गडदे, भागवत गिरी, नितीन कांबळे, रवी देशमुख, रामदास काकडे, रमेश साखरे, विनायक शिनगारे,अनिल जोशी,युवराज कांबळे, शाहजी बराटे, रमेश नखाते,ज्ञानोबा चोले, बाबुराव गव्हाणे, राजाभाऊ गव्हाणे, सम्राट थोरात, किशोर थोरात,चंदू भांगे उपस्थित होते. 

         

यावेळी उपस्थितांना रमेशरावजी आडसकर, शाखा अभियंता एल. यु. साळुंखे, सुरेश यादव , सुरेश सोळंके,यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार खुळे यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामसेवक गोरखनाथ दळवे यांनी केले.यावेळी आसरडोह जि प सर्कल मधील सर्व कार्यकर्ते, कोळपिंपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close