shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोर्शीत क्षयरोग व कुष्ठरोग सक्रिय शोध मोहीम..!


मोर्शी - क्षयरोग हा गंभीर स्वरूपाचा आजार असून जनसामान्यांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. मा.पंतप्रधान हे 2025 पर्यंत क्षयरोग या आजारावर नियंत्रित करण्याकरिता प्रयत्न करत आहेत.

       राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पावेतो भारतात क्षयमुक्त करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 रोजी कुष्ठरोग शोध मोहीम  व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन कोरडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे या मोहिमेत उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी श्री. विनय शेलुरे,प्रशांत बेहरे,रितेश पुंड,अमोल झाडे,विकार अहमद,निळकंठ ठवळी तसेच स्वयंसेवक,नर्सिंग कॉलेज विद्यार्थी या शोध मोहिमेकरिता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.....
close