shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपाच्या महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला ; पोलिस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा पिडीताचा आरोप



संभाजी वामन यांनी केला अनेक गोष्टींचा खुलासा

प्रतिनिधी : संजय वायकर

 नगर : २६ /  अहमदनगर तालुक्यातील देवगाव येथील रिसॉर्ट हॉटेलची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद लावून ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर भरण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या  मागणीने ठराव घेण्यात आल्याचा राग धरून देवगावच्या महिला सरपंचाच्या पतीला जीवे मारण्याची सुपारी देत त्यांच्यावर दोन्ही पाय हात तोडून डोके फोडून जीवघेणा हल्ला करण्याची घटना दि .१७ ऑगस्ट रोजी नगर येथे घडली. 

जखमी संभाजी वामन यांनी सांगितले की, गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या घटनेला एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे . परंतु पोलिसांनी अनेक गोष्टींचा तपासच केलेला नाही . घटनेतील मुख्य आरोपी विठठ्ल तुकाराम वामन आणि नानाभाऊ वामन अजुन फरार आहेत . त्यांच्या कडील घटनेतील रिव्हॉल्वर तसेच स्कॉर्पिओ ही चारचाकी गाड़ी पोलिसांनी जप्त केली नसुन तक्रारीत सांगुन सुद्धा त्यांनी या गोष्टी नमुद न करता उलट मलाच अगोदर या घटनेचा साक्षीदार घेवुन या, मगच मान्य करू अशी संशयास्पद भुमिका घेतली आहे .  देवगावचे ग्रामसेवक अरविंद शेळके यांनीही सदर घटनेबाबत माहिती दिली . घटनेतील आरोपीने शेळके यांना फोन करून संभाजी वामन यांना जीवे मारणार असल्याची धमकीही दिली होती .

सरपंच कविता वामन यांनी सांगितले की , आरोपींपासुन त्यांच्या कुटुंबाला धोका असुन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा आमच्या जीवीतास पुन्हा  घातपात झाल्यास पोलिस प्रशासन जबाबदार राहिल .भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मधील गुन्हा रजिस्टर नं . ३५८ / २०२२ मधील तपासी अंमलदार हे गुन्हयाचा व्यवस्थीत तपास न करता आरोपीना गेल्या एक महिन्यापासून अटक न करता त्यांना पाठीशी घालत असल्या बाबतचे निवेदन संभाजी वामन यांनी अहमदनगर पोलिस अधिक्षक यांना दिले आहे .

 " मालमत्ता कर वसुली वाढल्यास याचा फायदा ग्रामपंचायतलाच होणार आहे . सरपंच निस्वार्थ वृत्तीने काम करत आहेत . आरोपीकडून माझ्या जिवाला धोका आहे . आतापर्यंत भाजपच्या एकाही राजकिय पुढार्‍याने घटनेची चौकशी केली नाही . स्थानिक नेत्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी . मी एक महिना साई एशियन हॉस्पिटल मधे अॅडमिट असताना स्थानिक भाजप नेते विचारपुस करण्यासही आले नाहीत याची खंत वाटते " - संभाजी वामन
close