shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहीती अधिकार दिवस साजरा करा..!

माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..!


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

 दि.२६,२८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय "माहिती अधिकार दिवस" जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात  आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन "म्हणून साजरा करण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा विद्यालये, महाविद्यालये ,विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये, माहितीचा अधिकार या विषयावर प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वकृत्व सारख्या स्पर्धा घेऊन २८ सप्टेंबर हा

"माहिती अधिकार दिवस" साजरा करण्यात यावा जिल्ह्यातील विविध समाजसेवी संस्थेच्या सहयोगाने उपक्रम राबवून  साजरा करण्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे दि.२६ सप्टेंबर सोमवार रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 



यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाध्यक्ष हिंगोली पंडित तिडके अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षा वंदनाताई थिट्टे,जिल्हा युवा अध्यक्ष अनिल लोंढे,जिल्हा प्रचारप्रमुख अजय गव्हाणे,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख,कळमनुरी तालुकाध्यक्ष रविकुमार गोरे,औंढा तालुका संघटक रानोजी घुगे,हिंगोली मुख्य प्रचारप्रमुख रवि इंगोले,हिंगोली प्रचार संयोजक रत्नराज काशिदे,वसमत तालुका संघटक रमेश साळवे,वसमत तालुका प्रचारप्रमुख राजु जटाळे,दलीत दिपके,सेनगांव तालुका प्रचारप्रमुख अनिल राऊत,हिंगोली सहसंघटक बद्रीनारायण गलंडे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close