shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक दिनाच्या निमित्ताने कवी हेमंत मुसरीफ यांच्या छान‌ कविता..!

1
शिक्षक  दिन ..

मातेच्या  ममत्वाने
करितो  श्रीगणेशा
शिक्षक रे जादुगार 
बदलतो भाग्य रेषा

वळण देई जिभेला
असो कुठली भाषा
पिता  तोचि  बनतो 
टेकवितो  आकाशा

नातेकधी बंधुत्वाचे 
जाणवते तयास्पर्शा
भगिनी बनूनि कधी
करी  तो स्नेह  वर्षा 

तोचरूप पुस्तकाचे
भागवतो ज्ञान तृषा
मित्रसवंगडी बनतो 
पुलकीत करे आशा

दाट काळोखा नंतर
अवतरे हळूचं  उषा
ईश्वरी साक्षात्कारतो
धारितो  नाना  वेशा


२)
शिक्षकी पेशा

गिरवितो  श्री गणेशा
शिक्षक बनुनि  माता
वळण लावी  जीवना
शारदास्पर्श हो  हाता

करडी शिस्त लावता
नकळत बनतो पिता
छत्र  दे आशीर्वादाचे
सांभाळी होवूनभ्राता

कसोटीत्याचीच लागे
परिक्षा आमची  घेता
त्याचाचं सबळ  हात
निराशा पदरात  येता

कुठलीचं नसे अपेक्षा
सखा भासे आवडता
देत  राहतो  सदोदीत 
हात न  घे आखडता

देवा सारखा  बरोबर 
संकटात  तोच  त्राता
विविध  रूपात दिसे
सगुण  निर्गुण देवता


३)

रुप शिक्षक ..

मातेच्या रे  ममत्वाने
तो  श्रीगणेशा करतो
रोप रूजे शिक्षणाचे
बाळसे  छान  धरतो

शिक्षक  जादुगार तो
भाग्य  रेषा  बदलतो
रुप आजी आज्याचे
अनुभव बोलबोलतो

अक्षराला जीवनाला
तोचि वळण लावतो
पित्याचा धाक अंगी
दुरूनि नजर  ठेवतो

तोल  जाता चालता
मित्रा  सम  सावरतो
दृश्य  अदृश्य  बनूनि
आजू बाजू  वावरतो

अपयश  येता  कधी
पाठी हात  फिरवतो
यश मिळे  घवघवीत
खांद्यावरी  मिळवतो

शिक्षक रूप ईश्वराचे
स्नेह  नजरेने पाहतो
इतके  करूनि  सारे
नामा निराळा राहतो

४)
महामानव शिक्षक ..

महामानवा दावीले
शिक्षक  कसा  हवा
वादळातही सुस्थीर
तेवत ठेवावा  दिवा

जातीपातीच्या रोगा
जालीम मिळो  दवा
हटवले धर्मांचे जाळे
पिढ्या तुज देई दुवा

शिक्षक  विद्यार्थ्यात
पुस्तके सांधती दुवा
वाचन  सवय  लावा
आराम  लाभे जीवा

नव्या जुन्या पिढीला
रे  विचार द्यावा नवा
विचार  आचरा येता
कसली नाही वानवा

पैलतिरावर अलगद
सर्वांच्या न्यारे नावा
मानव आहो आपण
सार्थ  करायचे नावा

प्रत्येकां समानन्याय 
शिक्षक असाचं हवा
उपस्थितीने  त्यांच्या
पुलकित व्हावी हवा

शिकवण तवअमोल
धन्यवाद महामानवा
बांधूनि  दिला  रस्ता
अपूर्व संविधान ठेवा



५)
आदर्श शिक्षक ..

राजेंद्र प्रसादे  कळले
शिक्षक कसा असावा
कृपा  छायेत  त्याच्या
मिळावा शांतविसावा

अडचणीच्याअंधारात
रस्ता सुस्पष्ट  दिसावा
आश्वासक कार्य त्याचे
विश्वास संपूर्ण बसावा

वेळेवर करावे ताडण
फुके डंबाचार नसावा
भले असू द्या कडवट
विचार त्याचा ठसावा

शिष्यावरला घाव तो
आधी त्यांने सोसावा 
आसवांचा थेंबथेंबही
गळण्याआधी पुसावा

मुर्त्या घडविता  सुंदर
मुर्तीकारे दंभ नसावा
आदर्श विद्यार्थी तया
जागो जागी  दिसावा


६)
पाच सप्टेंबर ..

पाचसप्टेंबर दिवस तो
सदैव  मला  डिवचतो 
गुरू आहेस  बाबा  तू
खूप  काही  शिकवतो

मुका फोनही  बोलतो
सकाळपासून वाजतो 
शुभेच्छांचा  वर्षाव तो  
चोही  कडून  बरसतो

विद्यार्थ्यांचा ताफातो
घरा ओसंडून वाहतो
फोटोसाठी पोजदेता
कसला  थकून जातो

सोशल मिडियावरती
छात्रा सह  छळकतो 
विसरलेला   विद्यार्थी
मला कसाओळखतो

शिक्षकपदास सन्मान
एक  दिवसीय असतो
पहिले  पाढे  पंचावन्न
दिवस दुसरा गिरवतो


७)
शिकवणी ..

शिक्षक दिन हा आला
जत्रेचं रूप झोपडीला 
हवसे  गवसे नि नवसे
किती  आले भेटायला 

ओळखीचे अनोळखी
कुणी ना आठवे  मला
फोटोसाठी पोज देता
थकून गेलो  रे चांगला

हार फुलांचा खच पडे
पगार  मात्र  अडकला
चौकशी करे वेतनाची
नेता कसला भडकला

मिठाई  पाहून कसला 
मधु  मेह गोड  हसला 
वाटून टाकली  मिठाई
हवे किती  एकट्याला 

शिक्षक  दिवस सरता
खुशाल  विसरा  मला
विसरू नका  मात्र बा
रे माझ्या शिकवणीला 

- हेमंत मुसरीफ पुणे 
   9730306996.
www.kavyakusum.com

८)
शिक्षक खरा ..

शिक्षक रे परिस्थिती 
शिकवत राहे  किती 
कुंभाराच्या चाकवरी
आकाराला येते माती

अनुभवाची ज्ञानधारा
नेत जाई निर्णयाप्रति
दगड धोंडे तीचं टाके
काटे कधी वाटेवरती 

सापशिडी खेळ चाले
प्रतिस्पर्धी ती  नियती
साप गिळे खाली नेई
क्षणार्धात शिडीवरती

गुरूदक्षिणा न मागते
अतिप्रिती शिष्याप्रती
मार्गदर्शक हवा कुणी 
नेहमी  येते  अनुभूती 

आरंभ ते अंता पर्यंत
चालत  राहते  संगती
असा शिक्षक न दुजा
तीचं  देणार सद् गति


९)
शिकवण..

शिक्षक  दिवस संपन्न  
पुरस्कार हो  वितरण
आदर्शशिक्षक झालो
पगारअडला का पण

छोट्या मागण्यांसाठी 
करावे  लागे उपोषण 
शिकवणी पेक्षा जादा
इतर कामांचे  दडपण 

कोरोना योध्दा  बोला
घरात सर्वांस  लागण
नेटचा  वीजेचा भुर्दंड
ऑनलाईन ते शिक्षण

नको  रे बुके  हार तुरे
हवे एकवेळचे  जेवण
यावे  खरेचं प्रत्यक्षात
नव शैक्षणिक  धोरण

उद्याला  विसरून जा
पुढील वर्षा  आठवण
शिक्षक असून मलाचं
मिळे भली  शिकवण 

 - हेमंत मुसरीफ पुणे 
   9730306996.
www.kavyakusum.com


close