मेहकर । अनिल मंजुळकर .
घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत घाटबोरी बीटअंतर्गत रंधा मशिन तपासणी वेळी अंदाजे ४५ हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन कार्यवाही करण्यात आली.वनरक्षक कीर्ती खरात यांच्या दबंग कार्यवाहीमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत घाटबोरी बिट१ मधील मौजे घाटबोरी येथे रंधा मशिन तपासणी वेळी मशिन मालकांवर वनविभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली. सहाय्यक वनरक्षक गवारे. वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीलायता , यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल डोईफोडे. वनपाल बोबडे. वनरक्षक कु. कीर्ती खरात. डी एस पवार. ए एस लथाड. कैलास धनगर.डि.आरु .कु.एच एम.शेख. कु. टि आर हांडे. वनमजुर समाधान गवई. संतोष काशीद. मारुती लथाड. यासह वन कर्मचारी हजर होते.

