काम करणाऱ्याला त्रास होतो त्यामुळे ही दगड आपल्याला झेलायची ताकद आपण ठेवली पाहिजे - दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारणार हे आयुष्यात लक्षात ठेवा. काम करणाऱ्याला त्रास होतो त्यामुळेही दगड आपल्याला झेलायची ताकद आपण ठेवली पाहिजे आहे असे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मौजे घोरपडवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या व विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवार दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी पार पाडला त्यानंतर उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना म्हटले.
घोरपडवाडी येथे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर, उपाध्यक्ष शिवाजी पानसरे, अध्यक्ष शुभम निंबाळकर,संजय गांधी निराधार अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गजानन लंबाते, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मारुती चांगन, युवा नेते संजय चव्हाण, सरपंच राजेंद्र चांगण, उपसरपंच सौ शोभा कवितके, ग्रामपंचायत सदस्य सौ लक्ष्मी कवितके, दादासो पिसे ,शशिकांत जाधव, सचिन लोहकरे, आप्पा कांबळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होते.
गोतंडी घोरपडवाडी दगडवाडी डांबरीकरण रस्ता ४ कोटी ५५ लक्ष, घोरपडवाडी अंतर्गत स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता ७ लक्ष ,घोरपडवाडी स्मशानभूमी ते घोरपडवाडी दगडवाडी शिवअंतर्गत रस्ता ७ लक्ष ,माने वस्ती येथे रस्ता करणे ८ लक्ष, घोरपडवाडी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, खरात वस्ती ते अजित माळी रस्ता करणे १० लक्ष, खरात वस्ती येथे रस्ता करणे ५ लक्ष, घोरपडवाडी स्मशानभूमी स्ट्रीट लाईट काम करणे १ लाख ५० हजार, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १२ लक्ष, दलित वस्ती बंदिस्त गटर काम ५ लक्ष, दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष ,कांबळे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, दलित वस्ती बंदिस्त गटार काम करणे ३ लक्ष ,जलयुक्त शिवार अंतर्गत ओड्यावरील तीन बंधारे बांधणे ५५ लक्ष, हाय मास्ट तीन दिवे बसवणे ३ लक्ष५० हजार, प्राथमिक शाळेसाठी क्रीडा साहित्य २ लक्ष, घोरपडवाडी येथे ओपन जिम साहित्य ५ लक्ष, वाघमोडे वस्ती येथे सभा मंडप बांधणे ५ लक्ष, घोरपडवाडी येथे आर ओ प्लांट बसवणे ५ लक्ष , इत्यादी कामे पूर्ण झाली असून त्याचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना रक्कम रुपये १ कोटी ८५ लक्ष, घोरपडवाडी गावठाण दलित वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३ लक्ष, घोरपडवाडी गावठाण दलित वस्ती येथे बंदिस्त गटर करणे ३, लक्ष, घोरपडवाडी गावठाण दलित वस्ती येथे बंदिस्त गटर करणे ३ लक्ष, घोरपडवाडी गावठाण दलित वस्ती येथे आरो प्लांट बसवणे ६लक्ष ही कामे मंजूर झाली असून त्याचे शुभारंभ करण्यात आले आहे. एकूण ७ कोटी ६५ लाख रुपयांची कामांचे उद्घाटन व शुभारंभ करण्यात आले.
घोरपडवाडी ग्रामपंचायततिच्यावतीने कामाची मागणी केली असता दत्तात्रय भरणे म्हणाले की,आपण घरची माणस आहात कामाची मागणी करण्यापेक्षा काम करू आणि नंतर सांगू कामाच्या बाबत तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या लोकांची काम केल्यामुळे गोरगरिबांची काम केल्यामुळे मला शांत झोप लागते.
आज ज्या खुर्चीत बसलो ते तुमचा तालुक्याच्या प्रमुख म्हणून तुमची काळजी घेऊन प्रत्येक गावाचा विकास करणे. गावाच्या प्रत्येक झोपडीपासून विचार करून सर्वांना कसं मदत होईल सर्वांना कसं सहकार्य होईल हा प्रयत्न कार्यकर्ता म्हणून केला आहे.
आयुष्यात प्रत्येकाला संकट आहेत, प्रत्येकाला स्पर्धा आहे. शेवटी आयुष्यात एक लक्षात ठेवा आनंद देण्याचा आनंद घ्यायचा असतो .आनंद गोल गोल आहे जेवढा आनंद दुसऱ्याला देऊ तेवढा आनंद दहापट आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. शेवटी आयुष्यात एक लक्षात ठेवा. आनंद द्या आणि आनंद घ्या .शेवटी प्रत्येकाला दुःख आहे. त्यातून संकटाला सामोरे जाऊन मार्ग काढायचा असतो म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदर आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढी मदत करता येईल. लोकांचं जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. अरे तुम्ही काय परमेश्वर नाही. सगळेच कामे तुमच्याकडून होतील असे नाही. सगळीच लोक तुम्हाला चांगले म्हणतील असेही नाही. जगात लोक परमेश्वराला सोडत नाहीत तुम्ही तर कोण? तुम्हाला नाव ठेवणार, तुम्ही एक लक्षात ठेवा ज्या झाडाला फळ आहेत त्या झाडाला लोक दगड मारतात .ज्याला फळ आहे त्याला दगड मारणार हे आयुष्यात लक्षात ठेवा. काम करणाऱ्याला त्रास होतो त्यामुळेही दगड आपल्याला झेलायची ताकद आपण ठेवली पाहिजे .

