shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा शहरात एसटी वळवा अन्यथा प्रहारचा ST रोको


देवळाली प्रवरा - दि. ४ सप्टेबर
देवळाली प्रवरा शहरात एसटी वळवा अन्यथा प्रहारचा ST रोको आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी महामंडळाला पत्र देवून दिला आहे.

     श्रीरामपूर आणि राहुरी या दोन्हीकडे जाणाऱ्या सर्व बसेस यापूर्वी देवळाली प्रवरा शहरामधून जात होत्या परंतु सध्या एसटीच्या वाहक आणि चालकांना विनंती करूनही ते देवळाली प्रवरा शहरामध्ये बस वळवत नाहीत. त्यामुळे शहरांमधील वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुले, महिला यांना देवळाली प्रवरा शहरामधून जवळपास एक किलोमीटर देवळाली प्रवरा शहराच्या बाहेर देवळाली सोसायटी चौकात रस्त्यावर येऊन थांबावे लागते. 

त्यामुळे या रस्त्यावरती चौकात अपघाताचे प्रमाण वाढले असून या सर्व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व देवळाली प्रवरा सोसायटी चौकातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या सर्व बसेसपूर्वी प्रमाणे देवळाली प्रवरा शहरात वळविणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आप्पासाहेब ढुस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देवून विनंती केली की,  त्यांनी श्रीरामपूर आणि राहुरी कडे जाणाऱ्या सर्व बसेस पूर्ववत देवळाली प्रवरा शहरात वळवाव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देवळाली प्रवास सोसायटी चौकात एसटी बसेस रोखण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल असे आप्पासाहेब ढूस यांनी पत्रात म्हंटले आहे.
close