shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील भगवती येथील प्राचीन भगवती देवी संस्थानमध्ये नवरात्र उत्सवास प्रारंभ..!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.२७,हिंगोली जिल्हयातील सेनगांव तालुक्यातील भगवती येथे प्राचीन भगवती देवी संस्थानात नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी दि.२९ सप्टेंबर ते ०५ सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असुन या धार्मिक कार्यक्रमात विदर्भ-मराठवाड्यातील भाविक भक्तांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन संस्थानकडुन करण्यात आले आहे.



भगवती देवी संस्थान हे प्राचीन असुन जागृत संस्थान असल्याने नवरात्री काळात या भगवती देवीच्या दर्शनासाठी विदर्भ-मराठवाड्यातील भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.कोरोनामुळे दोन वर्ष नवरात्री महोत्सव साजरा करता आला नाही दोन वर्षानंतर संस्थानच्या वतीने नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याने भाविक भक्तातुन आनंद व्यक्त होत आहे.या कार्यक्रमात अखंड ज्ञानयज्ञ सोहळा असुन भागवताचार्य गणेशानंद महाराज शास्त्री भगवतीकर यांचे असुन दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकडा आरती,७ वाजता भगवती देवीची आरती,९ ते ११ देवी भागवत कथा,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ७ वाजता देवीची आरती व रात्री ९ ते ११ हरीकिर्तन असुन सप्ताहात नामाकींत किर्तनकारांचा सहभाग असनार आहे.दि.२६ सप्टेंबर रोजी टो येथील महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.दि.२७ सप्टेंबर रोजी भगवती येथील महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम,दि.२८ सप्टेंबर रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज भगवतीकर,दि.२९ सप्टेंबर ह.भ.प.सोपान महाराज अमरावती,दि.३० सप्टेंबर रोजी हभप दिपक महाराज बादाडे बीड,दि.१ आक्टोंबर हभप विजय महाराज शास्त्री अमानी,दि.२ सप्टेंबर रोजी हभप नामदेव महाराज लबडे पंढरपुर,दि.३ सप्टेंबर रोजी हभप सोपान महाराज शास्त्री,दि.४ सप्टेंबर रोजी हभप प्रकाश महाराज साठे बीड व हभप गणेशानंद शास्त्री भगवतीकर यांचे सकाळी काल्याचे किर्तन व लगेच महाप्रसादाचे वाटप होणार आहे.तसेच दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विदर्भ-मराठवाडा सिमा असलेली पैनगंगा नदीचे जलपुजन आ.तानाजी मुटकुळे व वाशिमचे आ.लखन मलीक यांच्या हस्ते होणार आहे.

close