श्रीरामपूर (प्रतिनिधी) : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन पत्रकारांनी पत्रकारीता करताना निर्भयपणाने पत्रकारिता करावी, पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणाने उभा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघांच्या नवनियुक्त सदस्य व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्याचे छोटेखानी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली हे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. शेख पुढे म्हणाले की, पत्रकारिता करताना समाजाभिमुख कार्य आपल्या हातुन घडून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पत्रकाराने सदैव उभे राहिले पाहिजे,असे कार्य करण्याची जिद्द आज उपस्थित असलेल्या प्रत्येक पत्रकाराच्या मनात कायम असावी, नव्याने पत्रकारिता करणाऱ्यांना नक्कीच चांगली संधी असुन आज डिजीटल माध्यम अतिशय जलद गतीने कार्य करत आहे. लघु वृतपत्र व पत्रकार संघ नेहमी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे असेही त्यांनी यावेळी सांगत नवनियुक्त सदस्य/पदाधिकारी यांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय खरात, आर. के. न्यूज चे संपादक राहुल कोळगे, पत्रकार संघाचे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष एजाज सय्यद, कोपरगा़व येथील सामाजिक कार्यकर्ते किसन सोनवणे,पत्रकार संघ सदस्य इब्राहिम शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात कोपरगांव तालुक्यातील कचरू लोहकरे, इब्राहिम शेख, दादाभाऊ मोरे, नवनाथ वाघ, अविनाश कांबळे आदी पत्रकारांची पत्रकार संघाच्या सदस्य पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले, कार्यक्रमास पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजमहंमद शेख, वेब पोर्टल चे संपादक ऋषिकेश पोळ, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, पत्रकार संघ सदस्य रसूल सय्यद, हमद पठाण, दादाभाऊ मोरे, सामाजिक कार्यकर्ते गोरे यांच्या समवेत जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते, शेवटी उपस्थितांचे आभार एजाजभाई सय्यद यांनी व्यक्त केले.

