*मुलांनी आई वडीलांची सेवा करावी-ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पठाडे*
इंदापूर प्रतिनिधी:रविवार दि.०४ सप्टेंबर २०२२ रोजी येडेवस्ती,पळसदेव, ता.इंदापुर, जि.पुणे या ठिकाणी पळसदेवचे माजी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पांडुरंग हगारे यांचे पिताश्री कै.पांडुरंग(नाना) गंगाराम हगारे यांच्या प्रथम पूण्यस्मरणानिमित्त सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी प्रवचनात सांगितले की मुलांनी आई वडीलांची सेवा करावी. मुलांनी व्हाट्सअप, फेसबूकचा दूरूपयोग टाळावा. एकञ कुटूंब पद्धती सध्या नष्ट होत चालली आहे. त्यामुळे आई वडीलांनी मुलांवरती चांगले संस्कार करणे गरजेचे आहे, असे मत ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक शरद काळे, विद्यमान संचालक भुषण काळे, युवा नेते किरण काळे, गोकुळ हगारे, पप्पू हगारे, संपत काळे, संतोष काळे, ग्रामपंचायत सदस्य महिंद्र काळे, अंकुश जाधव, आप्पा बांडे, युवा नेते विशाल बनसूडे, सुजित मोरे त्याचबरोबर मोठ्या संख्येने पळसदेव व आसपासच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

