shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथील रणगाव ते रणमोडे वस्ती ,खंडोबानगर या रस्त्याची दुरवस्था

निमसाखर येथील रणगाव ते रणमोडे वस्ती ,खंडोबानगर या रस्त्याची दुरवस्था

हा रस्ता कोणत्याही शासन स्तरावरून किंवा एखाद्या फंडातून लवकरात लवकर व्हावा अशी नागरिकांची मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी निमसाखर परिसरात दुपारी पावसाने जोरदार स्वरूपात हजेरी लावली. झालेल्या या पावसामुळे निमसाखर येथील रणगाव ते रणमोडे वस्ती ,खंडोबानगर निमसाखर या रस्तावर पाणी साचून चिखल झाल्याने या भागातील येनाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, दूध उत्पादक तसेच इतर प्रवासी यांची गैरसोय होत असल्याचे येथील नागरिक यांचे म्हणणे आहे.  या रस्त्यावरील लोकवस्ती जवळजवळ ४०० ते ५०० च्या वरती आहे. तरी हा रस्ता कोणत्याही शासन स्थरातील किंवा एखाद्या फंडातून लवकरात लवकर व्हावाअशी येथील नागरिक यांची मागणी आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन  समितीकडे दिला असून तो मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील रणवरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
सदर नागरिकांची होणारी गैरसोय पाहता शासन स्तरावरून या रस्त्याची दुरावस्थेचा विचार करून   तात्काळ येथील रस्त्याचे काम मार्गी लावावे.
close