छायाताई पडसळकर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त काटी येथील भरतवाडी शाळेतील शिक्षकांचा केला सन्मान.
जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा - राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील काटी येथील भरतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर यांच्यावतीने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अभिमन्यू भोसले सर ,तरंगे मॅडम तसेच अंगणवाडी सेविका ,नुरजान शेख ,मदतनिस लतिका शेंडे यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी छायाताई पडसळकर म्हणाल्या की, आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

