दगडांची कविता......
आकाश सुपारे....
9822510254
अचानक फोरव्हीलर गाडी माझ्या समोर थांबली व त्यातील एक व्यक्ती थंडगार ए. सी. गाडीतुन खाली ऊतरुन मला म्हणाली..
आकाश सुपारे तु विद्रोही फार लिहीतोस खरा पण तुझ्या सात पिढ्यांनी कधि कविता लिहीली का?....
मी म्हणालो हो माझ्या सात काय त्याही पेक्षा जास्त निरक्षर पिढ्यांनी दगडांवर कविता लिहील्यात...
सुरुंग पेटवुन कवितांचे बार उडवलेत हवेत...
आमच्या बापाच्या लोखंडाच्या मनगटाने पहार अन सुकतीने किती कविता लिहील्यात ह्या मातीवर...
आमच्या दगडांचे शब्द तुमच्या सारख्या ए.सी. तल्या माणसांना आमच्या वेशीवर टांगलेल्या बापाच्या घामाच्या वासाने गंधाळलेल्या कविता कधिच वाचता येणार नाही साहेब..
तुमच्या येणार्या सात पिढ्यांना आमच्या कविता कळणार नाहीत...
राहीला विद्रोह...
हा तर रक्तातच आहे आमच्या...
कधि या आमच्या खानीवर साहेब... माझा बाप रोज दगडांवर एक कविता गिरवतो...
सगळेच शब्द वाचता येतात...
कविता जगतो साहेब आम्ही....
असो माठातलं एवढ थंडगार पाणी प्या साहेब...
तुमची बिसलरी ठेवा गाडीत..
असो...
साहेब ...तुमचं काहीही असो....
आमच्या हजारो पिढ्यांनी दगडावर गिरलेल्या निरक्षर कविता तुमच्या सात पिढ्यांना कळणार नाही...
म्हणुन आमच्या कविता कागदार रहात नाही...
त्या काळजात कायमच्या कोरल्या जातात.... साहेब......
निघा आता उन तापलय बरंच....
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

