shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाॅ खंडू रघुनाथ माळवे(खरमा) रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित..!

मुंबई । प्रतिनिधी :-
पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे सुपुत्र, साहित्यिक कवी डॉ खंडू माळवे यांना दि 18/9/2022 दैनिक रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार संपादक शाहू संबाजी भारती व विठ्ठल आंधळे यांचे हस्ते प्रदान
करण्यात आले.

याअगोदर "डाॅ खंडू रघुनाथ माळवे-खरमा उर्फ डॉ खं र माळवे रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. हा पुरस्कार सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते मिळाला आहे. त्याचप्रमाणे सावली जीवन गौरव पुरस्कार भालचंद्र मुंगणेकर व संजय साळगावकर यांचे हस्ते मिळाला आहे.डॉ खंडू माळवे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याने थोडक्यात सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत नव्हे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष आहेत. त्याच प्रमाणे मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळाने काव्यसंग्रह "चाळणीवाला 2013" मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला. 

कविता व हस्तलिखित लेखन केल्याने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, भारत बुक ऑफ रेकॉर्ड, नोंद आहे संतसाहित्य 500अभंग लिखित आहे. तसेच चित्रपटात काम केलेले असे हे अष्टपैलू कलाकार असल्याने महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ व चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


close