shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामपंचायत भिगवण व रोटरी क्लबकडून शिक्षकांचा सन्मान


ग्रामपंचायत भिगवण व रोटरी क्लबकडून शिक्षकांचा सन्मान
इंदापूर -भिगवण: दि ६ शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि.५ रोजी ग्रामपंचायत भिगवण व रोटरी क्लबकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा, भैरवनाथ विद्यालय,विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल,क्षीरसागर विद्यालय,आदर्श विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा भिगवण स्टेशन,कला महाविद्यालय या विद्यालय व शाळांतील शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी बापूराव थोरात,अजित क्षीरसागर, डॉ.महादेव वाळुंज,डॉ. प्रशांत चवरे प्रा.गावडे, सुचेता साळुंखे, पल्लवी वाघ,वंदना थोरात,डॉ. उज्वला लोणकर,सुमन मकवाना,विद्या घाडगे प्रा.नाचण यांनी सत्कार स्वीकारले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर, हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो,या जगात आई-वडिलांनंतर कोणाला महत्वाचे स्थान दिले जाते तर ते म्हणजे गुरु. याच गुरुंविषयी आदर,भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच 'शिक्षक दिन'.विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान अनन्य साधारण आहे. शिक्षकांशिवाय विद्यार्थी पूर्ण होत नाही. 

याप्रसंगी सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव, संजय देहाडे, रोटरीचे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे,वैशाली बोगावत,संजय खाडे, दत्ता धवडे, जावेद शेख, जयदीप जाधव, कपिल भाकरे,सत्यवान भोसले,किरण रायसोनी, संपत बंडगर,संजय चौधरी,सचिन बोगावत,प्रवीण वाघ व ग्रामपंचायत,रोटरीचे पदाधिकारी,विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.

close