शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
साहेब तुमची ED जरा गरिबांच्या
पाठीमागं पण लावा. म्हणजे श्रीमंताच्या
संपत्तीची जशी चौकशी होते. तशी
गरिबांच्या दारिद्रयाची देखील चौकशी होऊदे.
चौकशीनंतर एवढं दारिद्र्य कस काय आलं
म्हणून त्यांना जेलात नेऊन टाका..!!
भाकरीसाठी दिवसभर रक्त आटेस्तोपर्यंत
राबण्याऐवजी जेलात फुकटची भाकरी तरी
मिळंल. फुटपाथवर श्रीमंतांच्या गाडीच्या
अन् पडक्या घरात सापा विचवाच्या हवाली
जीव देण्यापेक्षा तिथं सुरक्षित निवारा तरी
मिळंल..!!
भर पावसात बिछाना इकड तिकड घेऊन
पळण्यापरीस त्या जेलात एकाजागी शांत
झोप तरी लागंल. अन् यातल काहीच नाही
मिळालं तर तिथं थोडीफार समता तरी बघायला भेटल..!!
साहेब खरच तुमची ED एकदा लावाच
गरिबाच्या पाठीमागं म्हणजे जगाला या देशाचं
वास्तव तरी कळंल. अन् त्यात तुम्ही लादलेल्या
महागाई मुळ गरिबांच मरान तरी दिसंल. देशात
लोकशाही आहे का भांडवलशाही अन् हुकूमशाही
हे तरी जगाला समजंल.

