प्रा.मनोज वाखरे यांचे हस्ते उद्घाटन व व्याख्यान संपन्न "
पुणे:- शनिवार दिनांक २४/९/२०२२ रोजी सकाळी ९:३० ते ११:०० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात श्रीमती सी. के. गोयल महाविद्यालय सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक: म्हणून गोयल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी प्रा. मनोजजी वाखारे (पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालय) हे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन: वृक्षाचे पूजन करून आगल्या वेगवेगळ्या पद्धतीने व सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातूनवृक्ष संवर्धनाच संदेश देत प्रमुख उद्घाटक: प्रा.मनोज वाखारे,महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सुभाष सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब माशेरे, व इतर प्राध्यापक यांच्या समवेत संपन्न झाले.
उद्घाटनानंतर पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीत: प्रा. डॉ.प्रियांका बच्चाव यांनी सादर केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक: महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलताना ते म्हणाले"२४ सप्टेंबर१९६९ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली.राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे उद्घाटन होत असून राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत असताना सामाजिक जाणिव, स्वतःचे व्यक्तिमत्त्वाचा विकास, साधला जातो, विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठान निर्माण होते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते. योजना विद्यार्थी घडवणारी योजना आहे."
राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे उद्घाटक व मार्गदर्शक : प्रा.मनोज वाखारे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना ते म्हणाले"विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नकारात्मक प्रवृत्तीला बाजूला केले पाहिजे. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढून स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे". त्यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले"राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी असून त्यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे "
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: कु. एकता शिंदे यांनी केले
आभार: कु. भूमिका म्हेञे,यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय: कु. पुनम यादव यांनी केला.
कार्यक्रमाचा समारोप: प्रा. डॉ. प्रियंका बच्चाव यांच्या सुमधुर आवाजात 'वंदे मातरम'! गीताने झाला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांमध्ये प्रा. सोमनाथ दडस, पा. सिद्धार्थ कांबळे, डॉ. शोभा शिंदे, डॉ.पौर्णिमा कोल्हे, प्रा. पठारे प्रतिश, प्रा. बैसाने पर्वतराव, प्रा.वाणी रोहिणी, प्रा. दिपाली खर्डे, प्रा.प्रियंका पवार, प्रा. उत्तम गोरड, डॉ. माने नागनाथ, प्रा.भांबळे अनिता व इतर प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

