shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" OUT LET " नसेल तर ? आणि पैसा कमवताना जीवनातील माणसे गमावत नाही ना याकडे लक्ष द्या..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  हिटलरने आत्महत्या केली शेवटी.!••
सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात. 
- आत्ताचीच नागपूर ची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण.? 

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.

माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे, हे विसरुन चालत नाही.

भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चँनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील "स्ट्रेस"बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता. डॉ. शितल आमटे,
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir ...मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?

मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा.फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा.. पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोप्प नाही का.?

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र..!
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!


 चांगले कर्माची फळे चांगलेच मिळतात..

आपली भारतीय संस्कृती जगमान्यता पावलेली संस्कृती आहे.त्याचे कारण म्हणजे आपल्या संस्कृतीत रामायण- महाभारतापासून इतरांना दानधर्म  करा, सर्वांना सहकार्य करा.. दुसऱ्याच्या सुख-दु:खात सहभागी व्हा.. याबद्दल अनेक ग्रंथात सांगितलेले आढळते.
          पैसा जरुर कमवा.. तो तर प्रत्येकाचा अधिकार आहे.परंतू पैसे कमावताना जवळची माणसे दूर होणार तर नाही ना? याची जाणीव ठेवली पाहिजे.आणि आपण कमावलेल्या पैशातून प्रत्येकाने दोन ते दहा टक्के दानधर्म केला पाहिजे.. त्यामुळे मनःशांती तर लाभतेच लाभते.. शिवाय पुढील येणाऱ्या अडचणी,संकटे टळत असतात. आपण केलेल्या चांगले कर्म फळामुळे आपण ज्यांच्या साठी हे सर्व काही करतो त्या पुढील पिढ्यांचे देखील कल्याण होते.अशी ही मान्यता आहे.. 


काळजी घ्या....

  🙏सोडून गेल्यावर "ᴍɪss ʏᴏᴜ" म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यंत "ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ" म्हणा आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.
समस्त नागरिकांना समर्पित...!


close