shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगावात शिवसैनिक आक्रमक,पाकिस्तानचा झेंडा जाळला..!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख

दि.२५,पाँप्युलर फ्रंट आँफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी एका आंदोलना दरम्यान"पाकिस्तान झिंदाबाद" घोषणा दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्याच्या निषेधार्थ आज दि.२५ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी ३ वाजता सेनगाव शहरात शिवसैनिक आक्रमक होत रस्त्यावर उतरुन पाकिस्तानचा झेंडा जाळला व वंदे मातरम्...पाकिस्तान मुर्दाबाद... पिएफआय मुर्दाबाद... अशी घोषणा बाजी करण्यात आली तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळुन संताप व्यक्त करण्यात आला.








हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील तहसिल कार्यालय रोडवर शिवसैनिक आक्रमक होत एकत्र जमले व पीएफआय संघटनेच्या समर्थकांना शिक्षा झाली पाहीजेत व दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सेनगाव शहरप्रमुख तथा नगरसेवक जगन्नाथ देशमुख,युवासेना जिल्हा समन्वय प्रविण महाजन,युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे-पाटील,जेष्ठ शिवसैनिक कैलासराव खाडे, चेअरमन तथा नगरसेवक वैभव देशमुख,गंगारामजी फटांगळे,देविदास कुंदर्गे,सुंदर खाडे,नगरसेवक संदीप कोकाटे,स्वप्नील देशमुख,प्रशांत देशमुख,सर्कलप्रमुख पिनु पाटील,राजु झाडे,आवेज पठाण,फिरोज पठाण,अजय उटकर,गणेश रंजवे,जिवन देशमुख,विलास सुतार,बळीराम जाधव,कपिल हनवते,आंबादास कासार,साई कुंदर्गे,पंडीत धोत्रे,सचिनभैया जाधव,हनुमान खणपटे,बालाजी मुळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close