shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या कार्याला आणि पाठ पुराव्याला यश .! पिपंरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने बर्ड व्हॅली उद्यानात जागतिक दर्जाचे भव्य दिव्य रंगीत पाण्याच्या कारंज्यांचे थयथयाट..!!

*🌸🍀जय बजरंग जय वडार🍀🌸*

आपणास सांगण्यास आनंद वाटत आहे.वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या कार्याला आणि पाठ पुराव्याला यश प्राप्त झाले आहे. पिपंरी चिंचवड महानगरपालिके च्या वतीने वडार मजूर शिल्प दाम्पत्य असलेल्या बर्ड व्हॅली उद्यानात जागतिक दर्जाचे भव्य दिव्य रंगीत पाण्याची कारंजी साकारण्यात आले आहे. आणि त्याठिकाणी पिपंरी चिंचवड शहराचा जडणघडण व इत्यादी माहिती एल. ई. डी स्क्रीन वर दाखवण्यात येत आहे. 

या स्क्रीन वर आपल्या वडार समाजाचा गौरवशाली इतिहास ज्येष्ठ अभिनेत्री व सिने दिग्दर्शक तसेच राजमाता जिजाबाई भूमिका साकारणारे मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या आवाजात वडार समाजाची गाथा त्याच्या बोलक्या शैलीत मांडले आहे. पिपंरी चिंचवड महानगरपालिका तसेच स्थानिक माजी उपमहापौर  तुषार भाऊ हिंगे यांचाही या ठिकाणी योगदान लाभला आहे.समाजाच्या हितासाठी वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान कायमचे कटिबद्ध आहे. प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात लवकरच आम्ही नवे संकल्पना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आम्हाला समाजातील तरुण वर्गांची साथ आणि ज्येष्ठांची मार्गदर्शन आमच्या पाठीशी असावी असे अशा करतो.*

अध्यक्ष :- अनिल विटकर
संस्थापक अध्यक्ष:- श्याम विटकर
close