shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत शारदीय नवरात्रउत्सवानिमित्त चिमुकल्यांसाठी "रास दांडिया"कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन "

भोसरी । प्रतिनिधी :-
      रासदांडिया कार्यक्रमात बाल चमुन,बरोबर पालकांचाही सहभाग, अतिशय आनंदी वातावरणात छोटी -छोटी मुले उत्साहाने झालीसहभागी, दांडिया कार्यक्रमात मध्ये शिक्षकही सहभागी! परिसरात सर्वत्र या कार्यक्रमाचे कौतुक!

         विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भारतीय परंपरेची ओळख व्हावी, संस्कार व्हावे, रूढी परंपरा समजाव्यात, मूल्यांचा विकास व्हावा, आनंद प्राप्ती, कलाविष्कार या गुणांच्या विकासासाठी नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये छोट्या (चिमुकल्या)मुलांसाठी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रास दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            गुरुवार दिनांक २९/९/२०२२ रोजी शाळेच्या वेळेत सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत शाळेच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रासदांडिया कार्यक्रमासाठी विद्यार्थी अतिशय सजून नटून, दांडिया स्वतःबरोबर घेऊन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, नारायणहट सोसायटीतील सभासद भगिनी, आजूबाजूच्या परिसरातील माता-भगिनी, उत्साहाने बालचिमुकल्या समवेत सहभागी झाले होते.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करून, सामूहिक आरती घेण्यात आली.पूजा, आणिआरतीनंतर नवरात्रीचे महत्व याविषयी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी पुढील माहिती दिली"अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमी पर्यंतचा कालखंड याला नवरात्र असे संबोधले जाते. दुर्गादेवीने वेगवेगळ्या अवतार घेऊन शुभ , निशुभ, रक्तबीज, महिकासुर, इत्यादी राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले. त्याचा वध केला म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तिच्या विजयाचा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. नवरात्र उत्साहाने श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण खास करून स्त्रि शक्तीला अभिवादन करणारा ,स्त्रि शक्तीचा महिमा वर्णन करणारा, आणि स्त्रिला देवीचे रूप समजून तिचा आदर, पूजा ,अर्चा करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय. नवरात्रीत विविध उपक्रमाचे आयोजन केले वेगवेगळ्या स्पर्धा दांडिया,  गरबा, भोंडला हे कार्यक्रम घेतले जातात."शाळेने छोटे चिमुकल्यांसाठीदांडिया चा कार्यक्रम नवरात्रीनिमित्त आयोजित केला आहे.

       मार्गदर्शनानंतर प्रत्यक्ष दांडिया खेळास सुरुवात झाली. देवीची विविध गाणी साऊंड सिस्टिम वरलावून त्यावर मुले पालक शिक्षक यांनी आनंदाने दांडिया खेळला. विशेषतः लहान मुलांमध्ये या खेळाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून आली मोठ्या उत्सुकतेने भालचमू पालकांसमवेत व इतर विद्यार्थ्यांसमवेतदांडिया खेळत होते.
      हा कार्यक्रम पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. लहान मुलांचे कौतुक सर्वत्र होत होते. शाळेमध्ये अतिशय उत्साहाचेआणि आनंदाचे वातावरण होते.शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित "रास दांडिया" कार्यक्रमाचे संयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे अध्यक्ष: संदीप बेंडुरे, अंकुशराव गोरडे,डॉ. वसंतराव गावडे, डॉ. सुयोगकुमार ताराळकर, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, डॉ. शरद कदम , संजय सांगळे, मुकुंद आवटे,उज्वला थिटे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, श्री प्रवीण भाकड यांनी केले.

     नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत 'रास दांडिया'या कार्यक्रमाचे हे पहिले वर्षा असूनअतिशय उत्साह पूर्ण वातावरणात  हा कार्यक्रम संपन्न झाला.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर विविध संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम नारायण हट शिक्षण संस्थेचे शाळेत राबविण्यात येत असल्यामुळे भोसरी व इतर परिसरात या शाळेचे सर्वत्रकौतुक होत आहे. निगडी येथील ज्ञानप्रबोधनीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व उपक्रम होत असून शाळेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
close