शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२
सावित्री-ज्योती पुरस्काराने श्री. व सौ. साठे दाम्पत्याचा सत्कार..!!
अहमदनगर : जय युवा अकॅडमी अहमदनगर आयोजीत सावित्री-ज्योती मोहत्सव यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दांपत्याला ज्योती सावित्री पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. सन 2022 या वर्षांमध्ये हा पुरस्कार राहुरी येथील श्री. ना.म.साठे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सिंधुताई साठे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला.
जय युवा अकॅडमी अहमदनगर यांच्या वतीने हा पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह पैठणी व ट्रॉफी असे आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

