shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एम टी एस ऑलम्पियाड स्पर्धा परीक्षेत श्री.मराठी मिडियम स्कूलचा 100%निकाल


प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : 14 /  येथील महाराष्ट्र सेवा संघ संचालित, श्री. मराठी मिडियम स्कूलमध्ये एम टी एस स्पर्धा परीक्षेत,घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षिकेंचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.

या परीक्षेत प्रशालेचे 4 विद्यार्थी राज्यात प्रथम आले.20 विद्यार्थांना स्पेशल गोल्ड मेडल तर 8 विद्यार्थांना सिल्व्हर मेडल मिळाले आहे.3 विद्यार्थी खास प्राविण्य मिळवून  उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांचा बक्षीस समारंभ प्रभारी मुख्याध्यापिका सौ.कुमुदिनी वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या प्रशालेतील शालेय व्यवस्थापन समितीचे संस्थापक सदस्य व जैन गुरुकुल प्रशालेतील निवृत्त पर्यवेक्षक अरुण कुमार धुमाळ आणि या भागातील नगरसेविका सौ. राजश्री बिराजदार यांची व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगलाचरण
गायनानंतर प्रशालेच्या वतीने दोन्हीही अतिथींचा सन्मान करण्यात आला. प्रशालेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रशालेतील शिक्षकांमार्फत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अरुण कुमार धुमाळ यांनी श्यामची पुस्तकातील कथा सांगून उत्तम संस्कार हेच शिक्षण या संस्थेच्या ब्रीदवाक्याचे स्पष्टीकरण केले. नगरसेविका सौ.राजश्री बिराजदार यांनी अनेक उदाहरणे देऊन संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षांनी प्रशालेतील प्रगतीचा आलेख उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, सूत्रसंचालन.. सहशिक्षिका सौ.राधा इंगळे यांनी करुन शेवटी आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल, प्रशालेतील शिक्षिकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत व्हनमाने यांच्यासह शिक्षिका आणि सेविकांनी
 परिश्रम घेतले. या कौतुक सोहळ्यास पालक वर्ग अधिक संख्येने उपस्थित होता .
close