चारोळ्या
नकळत डोळे भरून येतात
तुझा निरोप घेताना
मी नुसता पाहत असतो
तुला दूर जाताना
माणसांच्या गावांमध्ये
माणुसकीचा अभाव आहे
थोडक्यात माणसां जवळ
माणुसकीचा स्वभाव आहे
चांदण्यांचा गाव
आभाळात सजला होता
अंधाराची शाल पांघरून
शांत निजला होता
कवी :-
बाबासाहेब पवार

